शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

शेतकर्‍यांची थट्टा करू नका; बोंडअळीची मदत तातडीने द्या! जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत ठराव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:13 IST

अकोला : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी सरकारने मदत जाहीर केली; मात्र प्रत्यक्षात मदतीचा लाभ अद्याप शेतकर्‍यांना मिळाला नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांची थट्टा न करता शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला. 

ठळक मुद्देजिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत ठराव !

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी सरकारने मदत जाहीर केली; मात्र प्रत्यक्षात मदतीचा लाभ अद्याप शेतकर्‍यांना मिळाला नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांची थट्टा न करता शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ात कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, पीक नुकसान भरपाईपोटी कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली; परंतु या मदतीचा लाभ जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मिळाला नाही, त्यामुळे शेतकर्‍यांचा अंत न पाहता शासनाने बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी सभेत केली. त्यानुसार बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशा मागणीचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. मंजूर करण्यात आलेला ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले. पाणीटंचाई निवारणाच्या कामांसह विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, सभापती रेखा अंभोरे, देवका पातोंड, माधुरी गावंडे, पुंडलीक अरबट यांच्यासह समितीचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, गोपाल कोल्हे, दामोदर जगताप, डॉ. हिंमत घाटोळ, रामदास लांडे, शोभा शेळके, गजानन उंबरकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दूषित पाणी नमुने आढळलेल्या गावांमध्ये ‘आरओ प्लांट’ची कामे करा!जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या ८९ लाख रुपयांच्या निधीतून कोणत्या कामांचे नियोजन करण्यात आले, अशी विचारणा सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सभेत केली. त्यावर उपलब्ध निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्पांतर्गत (आरओ प्लांट) केंद्र सुरू करण्याच्या कामांचे नियोजन करण्यात आले असून, या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये दूषित पाणी नमुने आढळून आले आणि किडनी विकाराचे रुग्ण आढळून येणार्‍या गावांमध्ये ‘आरओ प्लांट’ची कामे करण्याची मागणी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सभेत केली.

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणाचा निषेध! धुळे जिल्ह्यात विखरण येथील प्रकल्पबाधित शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. या प्रकरणाचा निषेध करीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी सदस्य गोपाल कोल्हे यांनी सभेत केली. त्यानुसार  शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यात येत असल्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.

‘कृषी’च्या आठ योजनांसाठी लाभार्थी याद्यांना मंजुरी! जिल्हा परिषद सेस फंडातून सन २0१७-१८ या वर्षात कृषी विभागामार्फत विविध आठ योजना राबविण्यात येत आहेत.  ९0 टक्के अनुदानावर शेतकर्‍यांना साहित्य वाटपाच्या या योजनांसाठी निवड करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या लाभार्थी याद्यांना मंजुरी देण्यात येत असल्याच्या ठराव घेण्यात आला.

शेतात सांडपाणी; शेतकर्‍याला न्याय देण्याची मागणी!बाळापूर तालुक्यात हाता येथील शेतकरी श्रीकृष्ण कौसकार यांच्या शेतात सांडपाणी सोडण्यात आल्याने, शेती व पिकाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात संबंधितांकडे त्यांनी तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी व संबंधित शेतकर्‍याला न्याय देण्याची मागणी सदस्य गोपाल कोल्हे यांनी सभेत केली.

पाणीपट्टी वसुलीबाबत विचारणाजिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवठा योजनांतर्गत थकीत पाणीपट्टी किती आणि पाणीपट्टी वसुली किती, याबाबत सदस्य शोभा शेळके यांनी सभेत विचारणा केली. त्यानुषंगाने थकीत पाणीपट्टीच्या तुलनेत साडेतीन टक्के पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण असून, येत्या फेब्रुवारीपर्यंत आठ कोटी पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ग्रामसेवकांना देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस.एम. कुळकर्णी यांनी सभेत दिली.

निकृष्ट शौचालयांची चौकशी करा!स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयांपैकी निकृष्ट शौचालय बांधकामांची चौकशी करण्याची मागणी सदस्य रामदास लांडे यांनी सभेत केली. अशीच मागणी शिक्षण व अर्थ सभापती पुंडलीकराव अरबट यांनी केली.

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषद