शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कार म्हणजे बनावाबनवी , हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका - डॉ. स्वप्ना लांडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:39 IST

अकोला- महालक्ष्मी हलल्या,  दरवाज्यापर्यंत आल्या, कुठल्यातरी बाबाने अंगारा, तिर्थ, खडीसाखरेच प्रसाद निर्माण केला, हातावर जळता कापूर घेतला असे चमत्कार केल्याचा दावा अनेकदा केला जातो. पण असा कुठलाही चमत्कार होत नाही,  असे चमत्कार म्हणजे बनावाबनवी आहे, हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका असे आवाहन अ.भा. अनिसच्या वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख डॉ स्वप्ना लांडे  यांनी केले. 

ठळक मुद्दे मलकापूर मधील साने गुरूजी शाळेमध्ये अ.भा. अनिसच्या वतिने ‘बाबा ते बाबा’ या अभियान. विद्यार्थ्यांकडूनही जळता कापूर हातावर घेऊन नंतर मुखात टाकण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले.

साने गुरूजी शाळेमध्ये अंधश्रद्धेविरोधात जनजागृती अकोला- महालक्ष्मी हलल्या,  दरवाज्यापर्यंत आल्या, कुठल्यातरी बाबाने अंगारा, तिर्थ, खडीसाखरेच प्रसाद निर्माण केला, हातावर जळता कापूर घेतला असे चमत्कार केल्याचा दावा अनेकदा केला जातो. पण असा कुठलाही चमत्कार होत नाही,  असे चमत्कार म्हणजे बनावाबनवी आहे, हातचलाखी आहे त्याला बळी पडू नका असे आवाहन अ.भा. अनिसच्या वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख डॉ स्वप्ना लांडे  यांनी केले. स्थानिक मलकापूर मधील साने गुरूजी शाळेमध्ये अ.भा. अनिसच्या वतिने ‘बाबा ते बाबा’ या अभियानात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी साने गुरूजी शाळेचे मुख्याध्यापक संजय इंगळे हे होते तर मंचावर अ.भा.अनिसचे भारत भाऊ इंगोले , पातुर तालुका संघटक राठोड सर , महिला संघटिका  संध्याताई देशमुख अ मीनल इंगोले आदी उपस्थित होते. साने गुरूजी शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक प्रात्यक्षिके दाखवित डॉ. लांडे यांनी अंधश्रद्धा कशी फैलावते हे स्पष्ट करून सांगीतले. विद्यार्थ्यांनी अशा चमत्काराच्या मागे लागु नये, चमत्कारामागे जे बनावबनवी असती ती शोधावी, कुठल्याही चमत्काराने यश मिळत नाही त्यासाठी परिश्रम करावे लागतात अभ्यास करावा लागतो हे स्पष्ट करून सांगतांना डॉ.लांडे यांनी अनेक उदाहरणे दिली. जळत्या निखाºयावर चालणे हा चमत्कार नाही तर ती साधी वैज्ञानिक क्रीया आहे हे त्यांनी हातात जळता कापूर घेऊन करून दाखविले. विद्यार्थ्यांकडूनही जळता कापूर हातावर घेऊन नंतर मुखात टाकण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. मुलांशी संवाद साधत झालेले हे मार्गदर्शन अतिशय रंजक व प्रभावी ठरले. संध्याताई देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना अनेक प्रयोग करून दाखविले शालेय वयापासूनच चौकस बुद्धी ठेवली तर अंधश्रद्धेचा प्रसार होणार नाही असे त्यांनी सांगीतले.

टॅग्स :Akola cityअकोला शहर