शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांमध्ये धास्ती निर्माण करू नका; ठोस निर्णय घ्या! -  आ. बाजोरियांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 13:03 IST

अकोलेकरांमध्ये धास्ती निर्माण करू नका, अशा दबावतंत्रापेक्षा अवैध इमारती नियमानुकूल कशा करता येतील, याविषयी ठोस निर्णय घेण्याचे निर्देश शिवसेना आमदार गोपीकि शन बाजोरिया यांनी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना दिले.

अकोला: महापालिकेच्या विसंगत धोरणामुळे शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून, कर्जाच्या बोजाखाली बांधकाम व्यावसायिक दबून गेले आहेत. अवैध इमारतींसंदर्भात प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या माहिती संकलनाचे स्वागत असले तरी भविष्यात इमारतींवर कारवाई होईल, अशी अकोलेकरांमध्ये धास्ती निर्माण करू नका, अशा दबावतंत्रापेक्षा अवैध इमारती नियमानुकूल कशा करता येतील, याविषयी ठोस निर्णय घेण्याचे निर्देश शिवसेना आमदार गोपीकि शन बाजोरिया यांनी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना दिले.शहराच्या विकासामध्ये बांधकाम क्षेत्राचे मोलाचे योगदान ठरते. मागील पाच वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या अतिरेकी भूमिकेमुळे शहरातील बांधकाम व्यवसायावर गंडांतर आले आहे. अवैध इमारतींसंदर्भात प्रत्येक वेळी कारवाईचा धाक दाखविला जातो. अशा इमारतींवर भविष्यात कारवाई होईल, या धास्तीपोटी नागरिकांनी व्यावसायिक संकुलांमधील दुकाने व अपार्टमेंटमधील सदनिकांची खरेदी करण्यास हात आखडता घेतल्याची परिस्थिती आहे. यावर तोडगा काढून अवैध इमारती नियमानुकूल करण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस यांनी अवैध इमारतींच्या मुद्यावर शहरातील सर्व इमारतींची माहिती संकलित (डेटा) करण्याचे निर्देश दिले. यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी मंगळवारी सायंकाळी स्थानिक विश्रामगृह येथे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शहरातील रस्ते, कॅनॉल रस्ता, पंतप्रधान आवास योजना तसेच रस्त्यांवरील पिवळे पट्टे मारण्यासंदर्भात मनपा आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, जि.प. सदस्य ज्योत्स्ना चोरे, नगरसेविका मंजूषा शेळके, सपना नवले, शशी चोपडे, योगेश गीते, युवा सेना जिल्हा अधिकारी विठ्ठल सरप, मनपाचे शहर अभियंता सुरेश हुंगे, नगररचना विभागातील संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर हिवरे, उपअभियंता श्रीराम पटोकार व धनंजय गावंडे उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका