शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाला सफाईची कामे तातडीने निकाली काढा! - मनपा आयुक्तांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 14:46 IST

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकाऱ्यांना अग्रिम रकमेचे वाटप केले असून, नाला सफाईची कामे प्रामाणिकपणे पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.

अकोला: शहरातील मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी झोन अधिकाऱ्यांना अग्रिम रकमेचे वाटप केले असून, नाला सफाईची कामे प्रामाणिकपणे पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. नाल्याची रुंदी व खोली लक्षात घेता त्यामधून नेमका किती क्युबिक मीटर गाळ निघू शकतो, यासंदर्भात आयुक्तांनी संबंधितांना सूचना केल्याची माहिती आहे.शहरातील प्रमुख मोठ्या नाल्यांची प्रामाणिकपणे स्वच्छता केल्यास पावसाळ्यात सखल भागातील रहिवाशांच्या घरात पाणी साचणार नाही, याची तसदी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यानुषंगाने किमान एक मीटरपेक्षा मोठ्या नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला असून, क्षेत्रीय अधिकाºयांना निर्देश दिले आहेत. नाला सफाईसाठी पूर्व झोनकरिता सहा लाख रुपये व उर्वरित इतर तीन झोनसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची अग्रिम रक्कम झोन अधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती आहे.महापालिकेत खांदेपालटमनपाच्या सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहायक आयुक्त पूनम कळंबे परीक्षेच्या कारणास्तव दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे झोन कार्यालयांचा कारभार विस्कळीत झाला. यासोबतच उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाडकर, दक्षिण झोनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहादूर जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होतील. या दोन्ही अधिकाºयांनी दीर्घ रजा घेतल्यामुळे आयुक्त संजय कापडणीस यांनी उत्तर झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पदाची सूत्रे विठ्ठल देवकते तर दक्षिण झोनची सूत्रे प्रशांत राजुरकर यांच्याकडे सोपविली आहेत.शहरात नाला सफाईला सुरुवातमनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी क्षेत्रीय अधिकाºयांना अग्रिम रक्कम दिल्यानंतर क्षेत्रीय अधिकाºयांनी नाला सफाईच्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र समोर आले आहे. आरोग्य निरीक्षकांनी ही कामे थातूरमातूर न करता प्रामाणिकपणे निकाली काढण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला