शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सभेत मंजूर ठरावांना विभागीय आयुक्तांची स्थगिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 10:53 IST

ठरावांना पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी मंगळवारी दिला.

अकोला : जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन सर्वसाधारण सभेत १४ सप्टेंबर रोजी वेळेवरच्या विषयांत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांच्या मुद्यावर जिल्हा परिषदेतील शिवसेना सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध अमरावती विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांना पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी मंगळवारी दिला.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण १४ सप्टेंबर रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आली. या सभेत वेळेवर घेण्यात आलेल्या विषयांमध्ये विविध १७ ठरावांना मंजुरी देण्यात आली. आर्थिक बाबीशी निगडित वेळेवर मंजूर करण्यात आलेल्या ठरावांना जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांना विरोध दर्शविला. रस्ते दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेल्या ३३ रस्ते कामांना मंजुरी देत नवीन ३ रस्त्यांची कामे रद्द करण्याच्या ठरावासह विविध १७ ठराव वेळेवरच्या विषयांत मंजूर करण्यात आल्याच्या मुद्दयावर शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर यांच्यासह १४ सदस्यांनी २२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध अमरावती विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करीत सर्वसाधारण सभेत वेळेवर मंजूर करण्यात आलेल्या ठरावांना स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वेळेवरच्या विषयांत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांना पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिला.पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी!जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वेळेवरच्या विषयांत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांविरुद्ध शिवसेना सदस्यांनी दाखल केलेल्या अपिलावर पुढील २९ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद