शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

सात-बारा ‘अपडेट’मध्ये जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:35 IST

Saat-Bara सात-बारा ‘अपडेट’ करण्याच्या कामात जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठयावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील आॅनलाइन सात-बारा अद्ययावत (अपडेट) करण्याचे काम महसूल प्रशासनामार्फत सुरू असून, ३ लाख ६२ हजार १७३ सात-बारापैकी ९ आॅक्टोबरपर्यंत ३ लाख ६१ हजार ३८३ सात-बारा अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ७९० सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आॅनलाइन सात-बारा ‘अपडेट’ करण्याच्या कामात जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठयावर आहे.आॅनलाइन सात-बारा अद्ययावत अद्ययावत करण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत दरवर्षी सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम करण्यात येते. त्रुटीची दुरुस्ती आणि ‘डाटा साइन’ केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अद्ययावत सात-बारा उपलब्ध करून देण्यात येतो. जिल्ह्यात एकूण ३ लाख ६२ हजार १७३ सात-बारा असून, त्यापैकी ९ आॅक्टोबरपर्यंत ३ लाख ६१ हजार ३८३ सात-बारा ‘डेटा साइन’ करण्यात आले आहेत. उर्वरित ७९० सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयस्तरावर सुरू आहे. त्रुटी दुरुस्तीचे काम पूर्ण करून लवकरच या सात-बाराचा ‘डाटा साइन’ करण्यात येणार आहे. त्यामुळे आॅनलाइन सात-बारा ‘अपडेट’ करण्याच्या कामात अकोला जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील एकूण ३ लाख ६२ हजार १७३ आॅनलाइन सात-बारापैकी ३ लाख ६१ हजार ३८३ सात-बाराचा डाटा साइन करण्यात आला आहे. उर्वरित सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम सुरू आहे.- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग