शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन; दुसरा ग्रंथ महोत्सव उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:40 IST

अकोला : राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई, जि.प. शिक्षण विभाग आणि जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व दुसर्‍या ग्रंथ महोत्सव (पुस्तक जत्रा) ९ ते ११ डिसेंबरदरम्यान भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, डाबकी रोड येथे होणार आहे. 

ठळक मुद्देखंडेलवाल विद्यालयात आयोजन अन्नसुरक्षा, कचरा व्यवस्थापनावर विज्ञान प्रतिकृती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, मुंबई, जि.प. शिक्षण विभाग आणि जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व दुसर्‍या ग्रंथ महोत्सव (पुस्तक जत्रा) ९ ते ११ डिसेंबरदरम्यान भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, डाबकी रोड येथे होणार आहे. यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘शाश्‍वत विकासासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम’ हा राहणार असून,  उपविषय आरोग्य आणि सुदृढ आरोग्य, संसाधन व्यवस्थापन व अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक व दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती आदी आहेत. या उपविषयांपैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित इ.६ ते ८ वी व इ. ९ ते १२ वीतील शालेय विद्यार्थ्यांकडून वस्तू प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण होईल. ९ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करतील. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे राहतील. विशेष उपस्थिती महापौर विजय अग्रवाल, प्रमुख अतिथी म्हणून खा. संजय धोत्रे, आ. गोपीकिशन बाजोरिया, शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, तर स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोपाल खंडेलवाल राहतील. विशेष अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष जमीर खान, शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. तारा हातवळणे राहतील. ११ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचा समारोप होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सीईओ एस. रामामूर्ती राहतील. बक्षीस वितरण जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे हस्ते होईल. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, शिक्षण उपसंचालक चंदनसिंग राठोड, विद्या प्राधिकरणचा संचालक रविकांत देशपांडे, डॉ. पी.व्ही. जाधव राहतील. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी, शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्रशांत दिग्रसकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, दिनेश तरोळे, विलास धनाडे,  संध्या कांगटे, शिक्षण विस्तार दिनेश दुतंडे, गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार,  विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भास्कर, विज्ञान पर्यवेक्षक अरूण शेगोकार, भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर इंगळे, मुख्याध्यापिका रसिका वाजगे, सुनील कराळे आदींनी केले. 

ग्रंथ महोत्सवातील कार्यक्रम९ डिसेंबर रोजी सकाळी १0 वा. प्रदर्शनीय वस्तू नोंदणी व ग्रंथ, दुपारी १२ वा. ग्रंथदिंडी, परिसंवाद, नाट्य स्पर्धा, बचाव स्पर्धा, उद्घाटन, सायंकाळी ५ वा. प्रदर्शन पाहण्यासाठी खुले, सांस्कृतिक कार्यक्रम, १0 डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, आकाशगंगा, कथाकथन स्पर्धा, कविसंमेलन, साहित्यिकांची मुलाखत, प्रकट वाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, ११ डिसेंबर रोजी वादविवाद स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, म्हणी सादरीकरण स्पर्धा, रसरंग, बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होतील.

टॅग्स :scienceविज्ञानAkola cityअकोला शहर