शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा : असित देसाई अजिंक्य; वेदांत कोल्हे उपविजेता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:07 IST

अकोला : वसंत देसाई स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे रविवारी जिल्हास्तरीय १७ वर्षांआतील मुले बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोला जिल्हा बॅडमिंटन अँण्ड शटर्ल्स असोसिएशनच्यावतीने केले होते. स्पर्धेतील अंतिम सामना असित देसाई व वेदांत कोल्हे यांच्यात झाला. असितने १९-२१,२१-१७,२१-१५ अशा गुणांनी सामना जिंकून अजिंक्यपद पटकावले.

ठळक मुद्देरविवारी पार पडली जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वसंत देसाई स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे रविवारी जिल्हास्तरीय १७ वर्षांआतील मुले बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोला जिल्हा बॅडमिंटन अँण्ड शटर्ल्स असोसिएशनच्यावतीने केले होते. स्पर्धेतील अंतिम सामना असित देसाई व वेदांत कोल्हे यांच्यात झाला. असितने १९-२१,२१-१७,२१-१५ अशा गुणांनी सामना जिंकून अजिंक्यपद पटकावले.प्रथम उपान्त्यफेरीचा सामना आशय कदम विरुद्ध वेदांत कोल्हे यांच्यात झाला. चुरशीच्या सामन्यात वेदांत कोल्हे याने २१-१८,२१-१७ ने विजय मिळविला. दुसरा उपान्त्य सामना असित देसाई विरुद्ध रोहन जिराफे यांच्यात झाला. असितने हा सामना २१-१९,२१-१५ ने जिंकला. अंतिम सामन्यात असित व वेदांतने उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले. स्पर्धेत जिल्हय़ातील ३२ खेळाडू सहभागी झाले होते. उद्घाटनीय सामना अंश जैन व ओम वाडे यांच्यात होऊन अंश सरळसेटमध्ये विजेता ठरला.स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योजक महेश मनवाणी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तुषार देशमुख यांनी केले. स्पर्धेचे आयोजन असोसिएशनचे संचालक व प्रशिक्षक निषाद डिवरे यांनी केले. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय बॅडमिंटनपटू संग्राम गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रवीण अग्रवाल, मंगेश देशपांडे, प्रा. राऊत, सुनील शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Akola cityअकोला शहरSportsक्रीडा