शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

ऑनलाइन सात-बारा उपक्रमात जिल्हा दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:07 IST

अकोला : जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सात-बारा सहजपणे उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने राबवलेला ऑनलाइन सात-बारा उपक्रम राज्यात कौतुकाचा ठरला आहे.

ठळक मुद्देप्रधान सचिवांच्या हस्ते जिल्हय़ाचा पुण्यात गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सात-बारा सहजपणे उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने राबवलेला ऑनलाइन सात-बारा उपक्रम राज्यात कौतुकाचा ठरला आहे. या उपक्रमात जिल्हय़ाला राज्यात द्वितीय स्थान मिळाले आहे. त्याबद्दल पुण्यातील यशदामध्ये आयोजित कार्यक्रमात महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजेश खवले यांच्याकडे प्रमाणपत्र देऊन जिल्हय़ाचा गौरव केला.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदशर्नाखाली जिल्हय़ातील सर्व सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले. तसेच सात-बारा संगणकीकरण करण्यासाठी जिल्हय़ातील १0३६ गावांचे डिक्लेरेशन-३ ही प्रक्रियाही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. ही बाब जिल्हय़ासाठी भूषणावह ठरली आहे. दैनंदिन कार्यपद्धतीत सुलभता व पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाकडून संगणकीय प्रणालीचा वापर होत आहे. त्यासाठी जिल्हय़ात ३ लाख ५३ हजार ७९३ सात-बारांचे संगणकीकरण झाले आहे. जिल्हय़ात पूर्णपणे ऑनलाइन सात-बारा वाटप केले जात आहे. शेतकर्‍यांना वर्षभर ३६५ दिवस सात-बारा मिळत आहे. हा उपक्रम लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अकोला तालुक्यातील चांदुर येथे शेतकर्‍यांच्या वेशभूषेत जनजागृती केली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते संगणकीकृत सात-बाराचे वाटप करून उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून राजेश खवले यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात अकोलाबरोबरच उस्मानाबाद आणि वाशिम या तीन जिल्हय़ात ऑनलाइन सात-बाराचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हय़ातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील रानडे व राऊत यांनी परिश्रम घेतले. -

टॅग्स :onlineऑनलाइन