शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक; प्रचारतोफा आज थंडावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:21 IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या गत सहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा रविवारी रात्री थंडावणार आहेत.

अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, निवडणूक प्रचाराची मुदत रविवार, ५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता संपणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या गत सहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा रविवारी रात्री थंडावणार आहेत.जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी मंगळवार, ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ गटांमध्ये २७७ आणि सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांमध्ये ४९२ असे एकूण ७६९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामध्ये विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक लढविणाºया उमेदवारांचा प्रचार गत ३१ डिसेंबरपासून सुरू झाला असून, निवडणूक प्रचाराची मुदत रविवार, ५ जानेवारी रात्री १० वाजता संपणार आहे.त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत निवडणूक लढविणाºया उमेदवारांच्या प्रचारतोफा ५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता थंडावणार आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि पंचायत समित्यांच्या १०६ गण अंतर्गत गावा-गावांमध्ये गत सहा दिवसांपासून सुरू असलेला उमेदवारांचा जाहीर निवडणूक प्रचार थांबणार आहे.

मतदान पथके सोमवारी होणार रवाना!जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १ हजार १७ मतदान केंद्रांवर ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेले मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची पथके सोमवार, ६ जानेवारी रोजी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद