शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक; आदेशाची धाकधूक कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 10:54 IST

न्यायालय नेमका कोणता निर्णय देते, यावरच निवडणूक प्रक्रियेचे भवितव्य अवलंबून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील पाच जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रमानुसार उद्या बुधवारपासून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याला सुरुवात होणार आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आरक्षित जागांच्या मर्यादेसंदर्भात दाखल याचिकेवर उद्या बुधवारी सुनावणीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. न्यायालय नेमका कोणता निर्णय देते, यावरच निवडणूक प्रक्रियेचे भवितव्य अवलंबून आहे.आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने ती कमी करण्याच्या मागणीसाठी आधी उच्च न्यायालय, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने गेल्या वर्षभरापासून चार जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक मार्च २०१७ पासून रखडलेली होती. पाचही जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया १९ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगाने ठरवलेल्या आरक्षणानुसार ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट, सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या सदस्य निवडीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ८ जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. निवडणुकीसाठी १८ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याला सुरुवात होत आहे. दरम्यान, उद्या बुधवारी सर्वोच्च न्यायालय आरक्षणाबाबत कोणता निर्णय देते, यावरच निवडणूक प्रक्रियेची पुढील गती अवलंबून आहे.

अध्यादेशाबाबत प्रतिज्ञापत्र देण्याचा आदेशदरम्यान, राज्यपालांनी ३१ आॅगस्ट रोजी अध्यादेश काढत जिल्हा परिषद निवडणुकीत नागरिकांच्या मागासप्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव ठेवण्याचे निर्देश दिले. त्या अध्यादेशामुळेही राखीव जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत आहे. त्या अध्यादेशाबाबत शासनाने उद्या बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही न्यायालयाने बजावले आले. शासनाच्या प्रतिज्ञापत्रानंतर न्यायालय कोणता निर्णय देईल, यावरच निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद