शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर; पीक नुकसानीची केली पाहणी !

By संतोष येलकर | Updated: April 12, 2024 19:40 IST

अवकाळीचा तडाखा : पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

अकोला: जिल्हयात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवारी पातूर तालुक्यातील तीन गावांना भेटी देत, शेतीच्या बांधावर पोहोचून पीक नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

गेल्या ९ व १० एप्रिल रोजी जिल्हयातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.उन्हाळी गहू, भुइमूग, कांदा, भाजीपाला पिकांसह फळपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी १२ एप्रिल रोजी जिल्हयातील पातूर तालुक्यातील अंबाशी, देऊळगाव, जांभरुन या तीन गावांना भेटी देत शेतातील पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी पातुरचे तहसीलदार राहुल वानखडे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत संबंधित तीन गावांच्या परिसरात आंब्याची झाडे, लिंबूच्या बागा, उन्हाळी भुईमूग, कांदा आदी विविध पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यानुषंगाने पीक नुकसानीचे काटेकोर पंचनामे करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिले.शेतकऱ्यांशी साधला संवाद; नुकसानीची घेतली माहिती !पाहणीदरम्यान, जिल्हाधिकारी कुंभार यांनी शेतकऱ्यांंसोबत संवाद साधून त्यांचे म्हणणे एेकूण घेतले व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीची माहिती घेतली.

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये !पीक नुकसानीचे सर्व तपशीलासह काटेकोर पंचनामे करुन, नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Akolaअकोला