शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या लोकप्रतिनिधींच्या सूचना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:30 IST

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सूचना जाणून घेतल्या.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पूर्वतयारीची बैठक घेतली.आढावा बैठकीत चर्चा होणाऱ्या जिल्ह्यातील विविध समस्या आणि विकासकामांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जुने बसस्थानकाची जागा महानगरपालिकेला उपलब्ध करुन देणे यासह इतर मुद्दयांवर लोकप्रतिनिधींनी या बैठकीत सूचना मांडल्या.

अकोला : जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि समस्यांच्या मुद्दयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार, ५ जुलै रोजी आढावा बैठक घेणार आहेत. त्यानुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सूचना जाणून घेतल्या.विधिमंडळाच्या नागपूर येथील पावसाळी अधिवेशनादरम्यान, ५ जुलै रोजी दुपारी १ वाजता अकोला जिल्ह्यातील विकासकामांसंदर्भात विविध समस्यांच्या मुद्दयांवर मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पूर्वतयारीची बैठक घेतली. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध समस्यांसह विकासकामांसंदर्भात उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जाणून घेतल्या, तसेच मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत चर्चा होणाऱ्या जिल्ह्यातील विविध समस्या आणि विकासकामांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या बैठकीला उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेश चौहाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.लोकप्रतिनिधींनी अशा मांडल्या सूचना !आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने कवठा बॅरेजचे काम पूर्ण करणे, बार्शीटाकळी नगर पंचायत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, जिल्हा स्त्री रुग्णालयात खाटांची संख्या ३०० वरून ५०० करणे, बोरगावमंजू ग्रामीण रुग्णालय बांधणे, चोहोट्टा बाजार येथे ग्रामीण रुग्णालय बांधणे, तेल्हारा नगर परिषद पूरक पाणी पुरवठा योजना करणे, अकोल्यात स्पिनिंग हब व टेक्सटाइल पार्क उभारण्याबाबत अहवाल सादर करणे, घुंगशी प्रकल्पातून मूर्तिजापूर शहराला पाणी पुरवठा करणे, अकोट तालुक्यातील १३२ गावांसाठी पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव, मोर्णा नदी विकास, अकोला विमानतळ विस्तारीकरणाचा प्रलंबित पश्न मार्गी लावण्यासाठी बैठक लावणे, अकोट येथे शंभर खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, अकोला, तेल्हारा येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे,अकोला व तेल्हारा तहसील कार्यालय इमारतीचे बांधकाम करणे, अकोल्यातील जुने बसस्थानकाची जागा महानगरपालिकेला उपलब्ध करुन देणे यासह इतर मुद्दयांवर लोकप्रतिनिधींनी या बैठकीत सूचना मांडल्या.

‘या’ कामांचा घेतला आढावा !आढावा बैठकीत मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत जिल्ह्यातील कामांची सद्यस्थिती आणि अपूर्ण कामे तसेच कृषी पंपांची वीज जोडणीची प्रलंबित प्रकरणे, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय