शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जिल्हा परिषद विषय समिती वाटप, समित्यांची रचनाही लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:20 IST

दोन विषय समिती सभापती पदांवर निवड झालेल्या सभापतींना समितीचे वाटप जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत करावे लागणार आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह दोन सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यासोबतच १० समित्यांची रचना करण्यासाठीची विशेष सभा येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बोलावण्यात यावी, असा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजणे यांना दिला आहे. अध्यक्षांनी सभेची तारीख ठरवल्यानंतर सदस्यांना नोटीस दिल्या जातील, असे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता दोन विषय समिती सभापती पदांवर निवड झालेल्या सभापतींना समितीचे वाटप जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत करावे लागणार आहे. त्या सभेतच १० समित्यांवर सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्या समित्यांमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्षाच्या सदस्यांचीही वर्णी लागणार आहे. सभागृहात बहुमताने हा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आता महाविकास आघाडीसोबतच भाजप कोणती भूमिका घेते, यावरही सभापतींना कोणत्या दोन विषय समित्या दिल्या जाणार आहेत, हे ठरणार आहे.जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या सावित्री राठोड, सभापतीपदी निवड झालेले चंद्रशेखर पांडे गुरुजी, पंजाबराव वडाळ यांना सहा विषय समित्यांपैकी प्रत्येकी दोन समित्या दिल्या जाणार आहेत. आधीच्या रचनेत उपाध्यक्षांकडे बांधकाम व आरोग्य समिती होती. तर उर्वरित दोनपैकी एका सभापतीकडे कृषी व पशुसंवर्धन तर दुसऱ्या सभापतीला अर्थ व शिक्षण समित्यांचे वाटप झाले होते. त्यापैकी कृषी व पशुसंवर्धन समिती अपक्ष माधुरी गावंडे यांना तर अर्थ व शिक्षण समिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिकराव अरबट यांच्याकडे होती. यावेळी या समित्यांच्या जोड्या कशा पद्धतीने तयार करायच्या हे सत्ताधारी भारिप-बमसंचे पदाधिकारी ठरवणार आहेत. त्यामुळे समित्यांची जोडी तुटण्याचीही शक्यता आहे.विषय समित्यांमध्ये सदस्यांची निवडजिल्हा परिषदेच्या सर्वच विषय समित्यांमध्ये किमान ७ व त्यापेक्षा अधिक सदस्यांची निवड केली जाते. त्यामुळे कोणता सदस्य कोणत्या समितीवर जाईल, याचीही रणनीती सत्ताधारी, विरोधी सदस्यांकडून ठरवली जाणार आहे. त्यामध्ये समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य, बांधकाम, शिक्षण, अर्थ, कृषी, पशुसंवर्धन, जलव्यवस्थापन या समित्या आहेत. त्या सर्वच समित्यांवर सदस्यांची निवड विशेष सभेत केली जाणार आहे.

पांडे गुरुजी यांना अर्थ व शिक्षण?जिल्हा परिषदेत सलग चौथ्यांदा निवडून आलेले सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना अर्थ व शिक्षण समिती मिळण्याची चर्चा आहे. तर पंजाबराव वडाळ यांना कृषी व पशुसंवर्धन दिल्यास उपाध्यक्षांकडे पूर्वीप्रमाणेच असलेल्या आरोग्य व बांधकाम सावित्री राठोड यांच्याकडे दिल्या जातील. जलव्यवस्थापन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून अध्यक्ष प्रतिभा भोजणे यांच्याकडेच समिती राहणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद