शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

 तूर डाळ वितरणात दांडी; २५ पाकिटांच्या पोत्यात डाळीच्या २३-२४ पाकिटांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:14 IST

अकोला: जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना एका पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे वितरित करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात डाळीच्या २३ ते २४ पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले आहे.का पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे वितरित करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात डाळीच्या २३ ते २४ पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. तूर डाळीची पाकिटे कमी मिळत असल्याने तूर डाळ वितरणात दांडी मारली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अकोला: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना एका पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे वितरित करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात डाळीच्या २३ ते २४ पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे तूर डाळ वितरणात दांडी मारली जात असल्याची बाब समोर आली आहे.बाजार हस्तक्षेप योजनेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थींना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये प्रती किलो दराने तूर डाळ वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारक लाभार्थींना तूर डाळीचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह फेडरेशनद्वारे जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांमार्फत तूर डाळीचा साठा जिल्हा पुरवठा विभागामार्फत रास्त भाव दुकानांना वितरित करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पोत्यात एक किलो वजनाचे तूर डाळीची २५ पाकिटे याप्रमाणे रास्त भाव दुकानांना तूर डाळ वितरित करण्यात येत आहेत; परंतु; २५ पाकिटांच्या एका पोत्यात प्रत्यक्षात तूर डाळीचे २३ ते २४ पाकिटेच रास्त भाव दुकानांना मिळत आहेत. रास्त भाव दुकानांना तूर डाळीची पाकिटे कमी मिळत असल्याने तूर डाळ वितरणात दांडी मारली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये किलो दराने तूर डाळ वाटप करण्यासाठी रास्त भाव दुकानांना उपलब्ध होणाºया तूर डाळीच्या साठ्यात एका पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे उपलब्ध होणे अपेक्षित आहे; परंतु प्रत्यक्षात रास्त भाव दुकानांना एका पोत्यात तूर डाळीचे २३ ते २४ पाकिटेच मिळत आहेत. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे तक्रार करण्यात आली आहे.-शत्रुघ्न मुंडे,जिल्हाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना,अकोला

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय