शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा खंडित; शेतकरी सिंचनापासून वंचित

By admin | Updated: November 9, 2014 00:32 IST

तेल्हारा तालुक्यात रोहित्र जळाल्यामुळे गत तीन महिन्यांपासून केवळ तीनच तास वीजपुरवठा.

अकोला: तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथे रोहित्र जळाल्यामुळे गत तीन महिन्यांपासून केवळ तीनच तास वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकरी पाण्याची व्यवस्था असल्यावरही सिंचन करू शकत नाही. आगामी दोन दिवसांच्या आत विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास उपोषण करण्याचा इशारा गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनातून दिला आहे. निवेदनानुसार, अडगाव बु. येथील पाच एम.व्ही.ए. चे रोहित्र तीन महिन्यांपूर्वी जळाले. तेव्हापासून वीज पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. तसेच महावितरणच्यावतीने रोहित्राची दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. सध्या अडगाव व १६ गावांना एकाच रोहित्रातून विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे अडगावमध्ये केवळ तीन तास वीजपुरवठा सुरू असतो. सध्या शेतातील रब्बी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, विद्युत पुरवठय़ाअभावी पाणी असल्यावरही पिके सिंचनापासून वंचित राहत आहेत. गावातील सर्वच शेतकर्‍यांचे उत्पादनाचे शेत हेच एकमेव साधन आहे. यावर्षी पावसाअभावी खरीप हंगाम गेला आता केवळ रब्बी हंगामावर आशा आहे. मात्र विजेअभावी पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. आगामी दोन दिवसाच्या आत गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.