शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांवर कीड, रोगराईचा धोका;  पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:12 IST

अकोला: विदर्भात अधून-मधून पाऊस व सतत ढगाळ वातावरण असल्याने खरीप पिकांवर विविध कीड, रोगांचा धोका वाढला आहे. कपाशीवर रसशोषण करणारी कीड तर सोयाबीनला बुरशीजन्य रोगाने ग्रासले आहे.

ठळक मुद्देकापूस, सोयाबीन पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या काही भागात बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवे आव्हान उभे ठाकले आहे.या वातावरणामुळे रस शोषण किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तसेच विविध रोगराई वाढण्याची शक्यता आहे.

अकोला: विदर्भात अधून-मधून पाऊस व सतत ढगाळ वातावरण असल्याने खरीप पिकांवर विविध कीड, रोगांचा धोका वाढला आहे. कपाशीवर रसशोषण करणारी कीड तर सोयाबीनला बुरशीजन्य रोगाने ग्रासले आहे.विदर्भात कापूस, सोयाबीन व धान प्रमुख पीक आहे. पावसाळी वातावरण आणि सतत ढगाळ वातावरणामुळे कापूस, सोयाबीन पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या काही भागात बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवे आव्हान उभे ठाकले आहे. आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला असून, अधून-मधून पाऊस सुरू च आहे. गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरण पिकांना अपायकारक असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कपाशीवर अगोदरच बोंडअळीने आक्रमण केले आहे. आता या वातावरणामुळे रस शोषण किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तसेच विविध रोगराई वाढण्याची शक्यता आहे.विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून, सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत; परंतु सध्या सोयाबीनच्या खोडामध्ये कीड आढळली. परिणामी, सोयाबीन शेंगांना अन्नद्रव्याचा पुरवठा होत नसून, पूर्ण सूर्यप्रकाश मिळत नसल्याने सोयाबीन शेंगांचे दाणे भरण्यास अडचणी येत आहेत. शेंगा चापट व अपरिपक्व असल्याचे दिसत आहे. हे शेतकºयांपुढे एक नवे संकट निर्माण झाले आहे.- बोंडअळीने शेतकरी त्रस्तयावर्षी अनेक उपाययोजना करू नही बोंडअळीने तोंड वर काढले असून, या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांचा खर्च वाढला आहे. अनेक ठिकाणी शेतकºयांनी विविध पर्याय करू न बघितले; पण अळी जुमानायला तयार नसल्याने अगोदरच शेतकरी हवालदिल झाला असताना आता नव्या कीड, रोगाच्या संकटाने तोंड वर काढले.- सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर रस शोषण करणाºया किडींसह सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशावेळी दोन टक्के युरियाची फवारणी करावी, तसेच बुरशीनाशकांचा वापर करावा; पण उत्पादन खर्च वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.डॉ. मोहन खाकरे,कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी