शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर येतोय मर रोग; शेतकऱ्यांची चिंता वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:58 IST

अकोला : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यात आता मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली असून, या दोन भागातील कपाशी पिकावर अल्प प्रमाणात हा रोग आढळून आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

अकोला : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यात आता मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली असून, या दोन भागातील कपाशी पिकावर अल्प प्रमाणात हा रोग आढळून आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.पश्चिम विदर्भातील कपाशी प्रमुख पीक असून, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही भागात खरीप पीक म्हणून कपाशी लागवड करण्यात येते; परंतु खान्देश, मराठवाडा तसेच विदर्भातील अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील सिंचनाची सोय आहे. तेथे पूर्वमान्सून कपाशीची लागवड मे महिन्यात करण्यात येते. यावर्षी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शासनाने २० मे पासून बीटी बियाणे विक्री सुरू केली असली, तरी बहुतांश ठिकाणी याअगोदर बीटी कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. कपाशीच्या बीटी वाणाची लागवड ही साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या २ ते ३ इंच पाऊस झालेला असेल, अशा वेळेस करावी लागते; पण ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्था होती, त्यांनी बीटी कपाशीची मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर पिकांच्या जोमदार वाढीसाठी रासायनिक खत, कीटकनाशके आणि वाढ नियंत्रकाचा अतिवापर करण्यात येत असल्याने या परिस्थितीत मे महिन्यात वाढलेले तापमान तसेच पिकाला ठिबक किंवा इतर माध्यमाने करण्यात आलेले ओलीत यामुळे जमिनीतील तापमानात होणारा सतत बदल व दिवसाच्या शुष्क वातावरणामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच जून महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी तसेच सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात जर पावसाचा खंड पडला आणि लगेच पाऊस आल्यास कपाशीवर विपरीत परिणाम होऊन ते आकस्मिक मर रोगाला बळी पडते; पण यावर्षी आताच मर रोगाच्या प्रादुर्भावाचे लक्षण कपाशीवर दिसत असून, कपाशी पीक निस्तेज दिसत असल्याच्या तक्रारी शेतकºयांमधून होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरी