शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या सवलती लागू ! ५१ महसूल मंडळांचा समावेश

By संतोष येलकर | Updated: November 29, 2023 18:14 IST

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय महसूल व वनविभागामार्फत गेल्या १० नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आला.

अकोला : शासन निर्णयानुसार दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ५२ पैकी ५१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीच्या सवलती लागू होत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मंगळवारी जारी केला.

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय महसूल व वनविभागामार्फत गेल्या १० नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महसूल मंडळांमध्ये अकोला जिल्ह्यातील ५२ पैकी ५१ महसूल मंडळांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ५१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीच्या विविध आठ सवलती लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुंभार यांनी जिल्ह्यातील संबंधित विभागांना दिला.

लागू केलेल्या अशा आहेत सवलती !जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी सवलती जिल्ह्यात लागू करण्यात आल्या आहेत.

दुष्काळसदृश परिस्थिती घोषित, असे आहेत महसूल मंडळ !अकोला तालुका : अकोला, घुसर, दहीहांडा, कापशी, उगवा, आगर, बोरगावमंजू, पळसो बु., सांगळूद, कुरणखेड व शिवणी.अकोट तालुका : अकोट, मुंडगाव, पणज, चोहोट्टा, कुटासा, आसेगाव बाजार, उमरा व अकोलखेड.तेल्हारा तालुका : तेल्हारा, हिवरखेड, अडगाव बु., पाथर्डी, पंचगव्हाण, माळेगाव बाजार.बाळापूर तालुका : बाळापूर, पारस, वहाळा, वाडेगाव, उरळ बु., निंबा, हातरुण.बार्शिटाकळी तालुका : बार्शिटाकळी, राजंदा, धाबा, पिंजर, खेर्डा बु., महान.पातूर तालुका : पातूर, बाभूळगाव, आलेगाव, चान्नी, सस्ती.मूर्तिजापूर तालुका : मूर्तिजापूर, हातगाव, निंबा, माना, शेलूबाजार, लाखपुरी, कुरुम, जामठी. 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ