शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हील लाइन, खदान पाेलिस ठाण्यातील ‘डीबी स्काॅड’बरखास्त; पथके सुस्तावली

By आशीष गावंडे | Updated: July 3, 2024 16:25 IST

चाेरीच्या घटनांचा उलगडा करण्यात कुचकामी

अकोला: जिल्हाभरातील प्रत्येक पाेलिस स्टेशनमध्ये गुन्हे शाेध पथकांचे (डीबी स्काॅड)गठन करण्यात आले आहे. या पथकातील चाणाक्ष पाेलिस कर्मचारी हे त्या-त्या पाेलिस स्टेशनचे डाेळे,कान समजल्या जातात. संभाव्य घटना व गुन्हा राेखण्यासाठी या पथकातील कर्मचाऱ्यांचे ‘नेटवर्क’तगडे असने अपेक्षित असताना ही पथके सुस्तावल्याचे चित्र आहे. यातूनच सिव्हील लाइन व खदान पाेलिस ठाण्यातील ‘डीबी स्काॅड’ जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बरखास्त केल्याची माहिती आहे.

अवैध धंद्यांना पायबंद घालून चाेरी व लुटमारीच्या घटनांना उजेडात आणन्यासाठी प्रत्येक पाेलिस स्टेशनमध्ये गुन्हे शाेध पथक (डीबी स्काॅड)गठीत केले आहे. या पथकात चाणाक्ष, चाैकस व कर्तव्याप्रती इमानदार असलेल्या पाेलिस अंमलदारांचा समावेश करण्यात आला. परंतु मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील गुन्हे शाेध पथकातील कर्मचारी कर्तव्य बजावण्यापेक्षा इतर बाबींकडे जास्त लक्ष देत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. वाहन चाेरी, गाेधन चाेरी तसेच घरफाेडीच्या घटनांमधील आराेपींचा सुगावा काढून त्यांना बेड्या ठाेकण्यात ही पथके कुचकामी ठरत असल्याचे समाेर आले आहे. आराेपींना अटक हाेत नसल्यामुळे की काय, चाेरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या सर्व बाबींचे सुक्ष्म अवलाेकन केल्यानंतर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सिव्हील लाइन व खदान पाेलिस स्टेशनमधील ‘डीबी स्काॅड’बरखास्त केल्याची माहिती आहे. ‘त्या’दाेन कर्मचाऱ्यांचा बाेलबालाखदान पाेलिस स्टेशनमधील गुन्हे शाेध पथकात सामील असलेल्या ‘त्या’दाेन कर्मचाऱ्यांनी स्वत:चे खिसे भरण्यासाठी पाेलिस यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. फिर्यादी काेणाविराेधात तक्रार करणार याची कुणकुण लागताच गैरअर्जदाराशी संपर्क साधणे, बाेलणीचे सर्वसाेपस्कार पूर्ण झाल्यानंतर तक्रार न देण्यासाठी फिर्यादीचे मन वळविणे, अवैध गुटखा व्यावसायिक, जुगार,वरली व्यावसायिकांकडून खिसे जड करुन घेणाऱ्या ‘त्या’दाेन पाेलिस कर्मचाऱ्यांसह पथकाचे एकूणच वर्तन पाहता पाेलिस यंत्रणेच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्हं उपस्थित हाेऊ लागले हाेते. प्रकरणांचा बाहेर निपटारा

सिव्हील लाइन पाेलिस ठाण्याच्या हद्दीत शाळा, महाविद्यालये, खासगी काेचिंग क्लास व इंटरनेट कॅफेंची माेठी संख्या आहे. त्यामुळे मुलींची छेडखानी, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना दमदाटी करुन पैसे उकळण्याचे प्रकार सतत हाेतात. यासंदर्भातील तक्रारींचा पाेलिस ठाण्याच्या बाहेरच निपटारा करण्यात ‘डीबी स्काॅड’व्यस्त असल्याचे बाेलल्या जात हाेते. या सर्व प्रकारापासून पाेलिस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ कसे, असा सवाल उपस्थित झाला आहे.