शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती निवारण साहित्य अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 14:23 IST

सर्व साहित्य धूळ खात असल्याचे तथा उंदराने कुरतडल्याने मोटर बोटी ‘पंक्चर’ झाल्याचे विदारक चित्र अकोट, मूर्तिजापूर आणि बाळापुरात आढळले.

अकोला : पावसाळ्यात पूर परिस्थिती अथवा वादळामुळे ओढविणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना मोटर बोटी, रस्सी, रिंग, जॅकेट, बॅटरी, भोंगे, माइक यासह अन्य साहित्य पुरविण्यात आले. दरम्यान, पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतर गुरूवारी तहसील कार्यालयांमध्ये साहित्य ठेवून असलेल्या कक्षांना भेटी दिल्या असता, सर्व साहित्य धूळ खात असल्याचे तथा उंदराने कुरतडल्याने मोटर बोटी ‘पंक्चर’ झाल्याचे विदारक चित्र अकोट, मूर्तिजापूर आणि बाळापुरात आढळले. बार्शीटाकळीत मात्र कक्ष सुसज्ज असल्याचा आढळला.

नाव ठेवली कचऱ्यात!आपत्कालीन या पथकात एका नौकेचा (मानव चलित बोट) समावेश असून, तीसुद्धा अडगळीत पडलेल्या अवस्थेत वर्षानुवर्षे ऊन, पावसात तशीच पडून असल्याने त्या नावेचे अनेक भाग कुजले आहेत.ऐनवेळी ती कामात पडते की नाही, याची खातरजमाही प्रशासन करीत नसल्याचे समजते. खरे तर या नावेची सुरक्षा घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे; परंतु सुरक्षेच्या नावाने अक्षता लावल्या जातात. नाव सुरक्षित व तिच्या देखभालीसाठी एका टिनशेडची आवश्यकता आहे व तिची नियमित साफसफाई होणे गरजेचे आहे; पण तसे न होता सदरची नाव धान्य गोदामाच्या बाजूला कचºयात पडली आहे. नावेमध्ये कचºयासह पावसाचे पाणी साचले असल्याने ती किती सुरक्षित आहे, याचा अंदाज येतो.शासकीय आपत्ती निवारण पथकाचे अस्तित्व साशंकतहसीलस्तरीय शासकीय नैसर्गिक आपत्ती निवारण पथक असल्याचे बोलल्या जाते; परंतु खरोखर हे पथक अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका निर्माण होणे सहाजिकच आहे. जेव्हा जेव्हा या तालुक्यात अशी स्थिती निर्माण झाली, तेव्हा तेव्हा बाहेरच्या आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. गतवर्षी पुराचा तडाखा बसल्याने दोघांना आपला जीव गमवावा लागला होता.त्यांचे मृत शरीर शोधण्यासाठी व इतरही आपत्ती निवारण करण्यासाठी वेळोवेळी गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर व स्थानिक आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय आपत्कालीन पथक अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न सहाजिकच उभा राहतो.

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटBalapurबाळापूरMurtijapurमुर्तिजापूर