शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वंचित तीन गावांत सुरू झाली मानव विकास मिशनची बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:22 IST

पातूर : चिखलगावनजीकच्या वाघजाळी, वरखेड, गोटखेड गावातील मुलींना पातूरला शाळेत जाण्या-येण्यासाठी मानव विकास मिशनची बस १८ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसचा लाभ मुलींना मिळावा म्हणून खासदार धोत्रे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने १८ तारखेला गावात बस आल्यानंतर शाळेच्या मुलींनी व पालकांनी बसचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. 

ठळक मुद्देखासदार धोत्रेंच्या प्रयत्नाने वंचित मुलींची गैरसोय दूर गावात बस आल्यानंतर मुलींनी व पालकांनी बसचे स्वागत करून व्यक्त केला आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : चिखलगावनजीकच्या वाघजाळी, वरखेड, गोटखेड गावातील मुलींना पातूरला शाळेत जाण्या-येण्यासाठी मानव विकास मिशनची बस १८ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसचा लाभ मुलींना मिळावा म्हणून खासदार धोत्रे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने १८ तारखेला गावात बस आल्यानंतर शाळेच्या मुलींनी व पालकांनी बसचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. पातूर तालुक्यात मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना त्यांच्या शाळेत जाण्या-येण्यासाठी मोफत प्रवासाची व्यवस्था केली आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या एसटी बसने गावापर्यंत मुलींना पोहोचून दिले जाते. पातूरजवळील शाळांमध्ये चिखलगाव येथील मुलींना नेण्यासाठी बस येते. चिखलगावपासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या बाश्रीटाकळी तालुक्यातील वाघजाळी, वरखेड व गोटखेड येथील मुली पातूरला शिकण्यासाठी येतात; परंतु बाश्रीटाकळी तालुक्यात असणार्‍या या गावांमध्ये एसटीची एकही बस जात नव्हती. त्यामुळे या गावातील मुलींना मिळेल त्या वाहनाने पातूरच्या शाळेत जावे लागत होते. परिणामी, या मुलींची गैरसोय होत होती. ही बाब या तिन्ही गावांतील मुलींच्या पालकांनी नांदखेड येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ज्ञानेश्‍वर इंगळे यांना सांगितली. इंगळे यांनी खासदार संजय धोत्रे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर खा. धोत्रे यांनी याबाबत पुढाकार घेऊन एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार केला. मानव विकास मिशन अंतर्गत योजनेतील बस वाघजाळी, वरखेड, गोटखेड येथे मुलींना नेण्या-आणण्यासाठी पाठवावी, यासाठी प्रयत्न केले.खासदार धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर १८ ऑगस्टपासून मानव विकास मिशन अंतर्गत एसटी बस शाळेतील मुलींना जाण्या-येण्यासाठी उपलब्ध झाली.