शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज करूनही दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 15:57 IST

अकोला : आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला : आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. दिव्यांग कक्षाच्या या प्रकारामुळे शेकडो दिव्यांगांना प्रमाणपत्राअभावी विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांगांसाठी दिव्यांग कक्षाची स्थापना होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचण्यांसाठी येथे बोलाविण्यात येते. या वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्यानंतरच दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्या जाते; मात्र मागील काही महिन्यांपासून दिव्यांगांनी आॅनलाइन अर्ज करूनही त्यांना तपासणीची तारीख देण्यात येत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिव्यांग कक्षाकडून कुठल्याच प्रकारचा संदेश न आल्याने बहुतांश दिव्यांग थेट कक्षाला भेट देऊन विचारणा करतात. त्यानंतर त्यांना दोन ते तीन दिवसांनंतरची तारीख दिल्या जाते. ज्या दिव्यांगांनी केंद्राला भेट दिली नाही, त्यांना क्वचितच तपासणीचा दिवस संदेशाद्वारे कळविण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहे. या प्रकारामुळे अनेक दिव्यांगांना फटका बसत असून, त्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.अजब कारभारामुळे दिव्यांग त्रस्तआॅनलाइन अर्ज करूनही वैद्यकीय चाचणी होत नाही. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष दिव्यांग कक्षाला भेट द्यावी लागत आहे. या ठिकाणी आल्यावर काहींना तपासणीची तारीख दिली जाते, तर काहींना उलटसुलट उत्तरे देत अद्याप तपासणीचा नंबर लागला नसल्याचे सांगण्यात येते. अशा अजब कारभारामुळे एका दिवसाच्या कामासाठी दिव्यांगांना हेलपाटे घेत वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोला