शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक दिव्यांग दुसऱ्या दिव्यांगाला आपल्या 'थ्री व्हीलर'ने मतदानासाठी नेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:05 IST

अकोला: दिव्यांगांचा मतदानामध्ये टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिव्यांग मतदार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे

अकोला: दिव्यांगांचा मतदानामध्ये टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिव्यांग मतदार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यावेळी महासंघाचे राज्य सहसचिव प्रकाश अवचार यांनी दिव्यांग व्यक्ती आपल्या थ्री व्हीलरवर दुसºया दिव्यांगाला मतदानासाठी नेणार आहे, असा निर्धार राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने केला असल्याचे माहिती दिली. या आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिले.जिल्ह्यातील दिव्यांगांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, याकरिता राष्ट्रीय विकास महासंघाचे योगदान राहणार आहे. जिल्ह्यात असणाºया मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांना मतदान करण्याकरिता स्वत: मोटारसायकलने नेणार आहेत, तसेच त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य सहसचिव प्रकाश अवचार यांच्यासह तुळशीराम गुंजकर,संगीता ठोंमरे, विठ्ठल होरे, कृष्णा करपे, गणेश सोनटक्के, हरिभाऊ सावतकर, निरंजन इंगळेसह असंख्य दिव्यांग बांधव सहकार्य करणार आहेत. समितीचे गठनदिव्यांगांचा मतदानामध्ये टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग मतदारांसाठी जिल्हास्तरीय समिती तयार करण्यात आली आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, शिक्षणाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, मनपाचे दिव्यांग कक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्य अपंग दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य अपंग बेरोजगार संघटना, राज्य अपंग विकास महासंघ, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड आदी विभागांचा सहभाग आहे. या समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी यांचे दालनात घेण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक