शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीएससी’च्या परीक्षा केंद्रात दिव्यांग उमेदवाराला प्रवेशासाठी मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:59 IST

अकोला : राज्यभरात रविवारी राज्यसेवा गट ‘क’ परीक्षा घेण्यात आली. याच दरम्यान अकोल्यात एका दिव्यांग परीक्षार्थीला लेखनिक उपलब्ध नसल्याने परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

अकोला : राज्यभरात रविवारी राज्यसेवा गट ‘क’ परीक्षा घेण्यात आली. याच दरम्यान अकोल्यात एका दिव्यांग परीक्षार्थीला लेखनिक उपलब्ध नसल्याने परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला; मात्र कालांतराने दिव्यांग आर्ट गॅलरीच्या माध्यस्थीने लेखनिकासह त्या परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला.राज्यसेवा गट ‘क’ पदासाठी रविवारी अकोल्यातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. याच दरम्यान अकोल्यातील बी.आर. हायस्कूल या परीक्षा केंद्रावर सचिन घायवळ नामक एका अंध परीक्षार्थीस प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. परीक्षार्थी अंध असल्याने त्याला लेखनिकाची गरज होती; परंतु ऐन वेळेवर लेखनिक उपलब्ध नसल्याने परीक्षा केंद्रावरील अधिकारी व निरीक्षकांकडून त्याला त्याला प्रवेश नाकारण्यात आला. तेवढ्यात सचिनच्या एका मित्राने या प्रकाराची माहिती दिव्यांग आर्ट गॅलरीला दिली. घटनेची माहिती मिळताच दिव्यांग आर्ट गॅलरीचे सदस्य प्रा. नितीन सातव यांनी परीक्षा केंद्र गाठले. परिस्थितीचा आढावा घेत परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना नियमाची उजळणी करून देत त्या अंध परीक्षार्थीला त्याचा हक्क मिळवून दिला. सोबतच लेखनिक बँकेच्या माध्यमातून लेखनिक उपलब्ध करून दिल्याने अंध परीक्षार्थी सचिन घायवळ याला दिलासा मिळाला.काय म्हणतो नियम...नियमाप्रमाणे कुठल्याही दिव्यांग व्यक्तीला वाचक तसेच लेखनिक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असते. त्यानुसार, ‘एमपीएससी’मार्फत दिव्यांग परीक्षार्थीला लेखनिक उपलब्ध करून देणे आवश्यक होते; परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही.दिव्यांग विद्यार्थी किंवा परीक्षार्थीला वाचक किंवा लेखनिक पुरविण्याची जबाबदारी परीक्षा घेणाºया यंत्रणेची असते; परंतु तसे होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश नाकारणे योग्य नाही. कायद्याने त्यांना अधिकारही दिला आहे. दिव्यांग आर्ट गॅलरी वाचक, लेखनिक राज्यभरातील विद्यार्थ्यांना पुरविण्याचे काम करते.- प्रा. विशाल कोरडे, अध्यक्ष, दिव्यांग आर्ट गॅलरी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMPSC examएमपीएससी परीक्षा