शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

माहिती, ज्ञान व प्रबोधनाचा दीपोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 14:20 IST

दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे, प्रकाश हे प्रगतीचे लक्षण आहे त्यामुळे या उत्सवाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’ ने दीपोत्सव या आगळयावेगळया दीवाळी अंकाची परंपरा सुरू केली आहे.

ठळक मुद्देपरम महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे गौरवोद्गारदीपोत्सवचे औपचारिक प्रकाशन

अकोला : दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे, प्रकाश हे प्रगतीचे लक्षण आहे त्यामुळे या उत्सवाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’ ने दीपोत्सव या आगळयावेगळया दीवाळी अंकाची परंपरा सुरू केली आहे. गेल्या काही वर्षापासून मी हा अंक आवर्जून वाचत असतो, माहिती, ज्ञान व प्रबोधनासोबतच मनोरंजन अशी मेजवानी दीपोत्सव देतो याचा आनंद आहे अशा शब्दात परम महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी काढले.डॉ.भटकर यांचे जन्मगाव असलेल्या मुर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा येथे गुरूवारी सकाळी दीपोत्सवचे औपचारिक प्रकाशन त्यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला.

या कार्यक्रमाला लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले, अकोला आवृत्तीचे वितरण व्यवस्थापक प्रकाश वानखडे, मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार, मुर्तीजापूरचे तालुका प्रतिनिधी दीपक अग्रवाल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ.भटकर यांनी लोकमतच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करीत ‘लोकमत’ व्यक्त करणारे हे वृत्तपत्र असल्याचे सांगीतले. बदलत्या काळात माहिती व तंत्रज्ञनाचा वेग वाढत असताना वाचन संस्कृती टिकेल की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे मात्र लोकमतने वेगवेगळे उपक्रम राबवुन वाचकांची नवी पीढी तयार केल्याचे ते म्हणाले. दीपोत्सव अंकाचे मुखपृष्ठ नव्या पीढीला जुन्या काळाची ओळख करून देणारे तर जुन्या पीढीच्या आठवणींना उजाळा देणारे असल्याचे सांगत ‘लोकमत’च्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी निवासी संपादक रवी टाले यांनी दीपोत्सव संदर्भातील भुमिका विषद केली.