शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

रुग्ण व नातेवाइकांना मिळणार जेवणाचे डबे!

By admin | Updated: August 3, 2016 01:43 IST

भावप्रसाद ट्रस्टचा पुढाकार : सदस्य पुरवणार दर गुरुवारी जेवणाचे डबे.

अकोला: कोणी नातेवाईक नाही, खिशात जेवणाचा डबा घेण्याइतपत खिशात पैसे नाहीत. अशा परिस्थितीत दोन वेळच्या अन्नाची गरज कशी भागवावी, अशी चिंता सर्वोपचार रुग्णालयात भरती होणार्‍या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सतावते. त्यांची गरज लक्षात घेता, कोणीही उपाशीपोटी राहू नये, या उदात्त हेतूने कौलखेड परिसरातील भावप्रसाद ट्रस्टने दर गुरुवारी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी भाजी व पोळीचे डबे पुरणविण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न समारंभ, इतर कार्यक्रमांमध्ये बरेच अन्न वाया जाते. घरातही अन्न शिल्लक राहते. अनेकदा ते अन्न फेकून दिल्या जाते; परंतु बाहेरही शेकडो गोरगरीब अन्नावाचून भुकेले आहेत. याचा आम्ही कसाही विचार करीत नाही. सर्वोपचार रुग्णालयामध्ये पश्‍चिम विदर्भातील पाचही जिल्हय़ातून दररोज शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येतात. रुग्णालयात आल्यावर त्यांना आठ, पंधरा दिवस भरती राहावे लागते. शहरात कोणी नातेवाईक नाही, ओळखीचं कोणीच नाही. खिशात पुरेसा पैसा नाही. दोन वेळचं जेवण घ्यावं तरी कोठून? अशी चिंता सतावते. रुग्णांना रुग्णालयाकडून जेवण दिल्या जातं; परंतु नातेवाइकांना जेवण मिळत नाही. रुग्णालयामध्ये अनेक सामाजिक, धार्मिक संस्था अन्नदान करतात; परंतु या संस्था खिचडी वाटप करतात. भाजी -पोळी कोणी देत नाही. ही बाब लक्षात घेऊन आणि रुग्ण व नातेवाइकांची गरज लक्षात घेऊन कौलखेड, खेतान नगर परिसरातील काही सेवाभावी नागरिकांनी एकत्र येऊन भावप्रसाद ट्रस्ट स्थापन केली आणि या ट्रस्टच्या माध्यमातून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना येत्या गुरुवारपासून जेवणाचे डबे पुरविण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम केवळ सेवाभाव म्हणून भावप्रसाद ट्रस्ट सुरू करणार आहे. संत गजानन महाराजांना मानणारा मोठा वर्ग विदर्भात आहे. महाराजांनीसुद्धा पत्रावळीवरील भाताची शिते वेचून खाल्ली आणि समाजाला अन्नदानाचा संदेश दिला. त्यामुळेच दर गुरुवारी जेवणाचे डबे उपलब्ध करून देण्याचा भावप्रसाद ट्रस्टचा मानस आहे. ही संकल्पना सुरेश टोहारे यांची असून, त्यांच्या या संकल्पनेला हनुमंत आगरकर, सागर विखे, कुणाल शिंदे, महावीर जैन यांच्यासह ट्रस्टमधील सदस्यांनी मुर्तरूप देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.