शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेगावातील डायलिसीस विभाग राज्यात प्रथम

By admin | Updated: August 13, 2016 01:11 IST

खारपानपट्टय़ातील गावांत किडनी आजारग्रस्तांची संख्या वाढती; ा साडेतीन वर्षांंत ८६८९ रुग्णांवर डायलिसीस.

गजानन कलोरेशेगाव (जि. बुलडाणा), दि. १२ : येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात डॉक्टर व कर्मचार्‍यांच्या उपचारासाठीच्या तत्परतेमुळे गेल्या साडेतीन वर्षांंत ८६८९ रुग्णांवर डायलिसीस करण्यात आले आहे. यामुळे येथील डायलिसीस विभाग संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकावर सेवा देणारे ठरले आहे. शेगाव तालुक्यासह नजीकच्या संग्रामपूर, जळगाव जामोद हे बुलडाणा जिल्ह्यातील तालुके भौगोलिकदृष्ट्या खारपाणपट्ट्यामध्ये येतात. या तालुक्यात पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने व पिण्यासाठी क्षारांचे पाण्याचाच उपयोग करावा लागत असल्याने किडनी आजारग्रस्तांची संख्या वाढती आहे. किडनी आजारामुळे या तालुक्यात अनेकांचे बळी गेले आहेत. किडनीच्या आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता या मतदारसंघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या प्रयत्नाने फेब्रुवारी २0१३ मध्ये शेगाव येथे सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात डायलिसीस युनिटची सुरुवात झाली. या युनिटची सुरुवात झाल्यापासून ऑगस्ट २0१६ अशा साडेतीन वर्षांंच्या कालावधीतया युनिटमध्ये ८,६८९ रुग्णांची डायलिसीस सायकल पूर्ण करण्यात आली आहे. रुग्णांचे डायलिसीस हे राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत या रुग्णालयात मोफत केले जाते. या युनिटमध्ये सद्यस्थितीत सहा डायलिसीस मशीन आहेत. यापैकी चार मशीन ह्या निगेटिव्ह रुग्णांकरिता व दोन मशीन ह्या पॉझिटिव्ह रुग्णांकरिता आहेत. या युनिटमध्ये ३५ रुग्णांचे आजमितीस हेमोडायलिसीस सुरु आहे, तर २९ रुग्ण हे प्रतीक्षा यादीत आहेत. आणखी दोन मशीनसुद्धा येथे सुरु होणार आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांचे मार्गदर्शनाने कमी कर्मचारी वर्ग असतानाही येथील अधिकारी व कर्मचारी डायलिसीस रुग्णांना वेळेवर चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावरून दिसून येत आहे. येथील रुग्णालयामध्ये किडणी रुग्ण तपासणीकरिता अकोला येथील डॉ.निखील किबे हे नियमित सेवा देत आहेत. शेगावसारख्या ठिकाणी रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा मिळत असल्याने येथे डायलिसीससाठी येणार्‍या रुग्णांची संख्या वाढती आहे. यामुळे सन २0१६ या वर्षात येथील डायलिसीस युनीट हे राज्यातून प्रथम क्रमांकाचे ठरले आहे. - डॉ.प्रेमचंद पंडितवैद्यकीय अधीक्षक, सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव