शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

 डायल ११२... दहाव्या मिनिटाला पोलीस मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 11:13 IST

New Police Helpline : लवकरच ‘११२’ या एकाच हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे.

ठळक मुद्देनवी हेल्पलाईन ठरणार वरदानजिल्हाभरात लवकरच होणार कार्यान्वित

अकोला : जिल्ह्यातील पोलिसांशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी ‘१००’ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. तो आता बदलला जाणार असून, लवकरच ‘११२’ या एकाच हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. हा नंबर डायल केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी हजर राहतील, असे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी ९ चारचाकी वाहने देण्यात आली आहेत.

जिल्ह्यात एकूण २३ पोलीस ठाणे आहेत. त्यात ११२ अधिकारी व २३२५ अंमलदार कार्यरत आहेत. दरम्यान, या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास त्यांना यापुढे ११२ हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदांत हा फोन कोठून आला, हे संबंधितांना कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांना एकाचवेळी सदर कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एकच हेल्पलाइन असावी, असा सूर सर्व स्तरातून उमटला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

......................

काॅल येताच कळणार लोकेशन

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, कुठलीही घटना घडल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. या क्रमांकावरून काॅल येताच विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळण्याची व्यवस्था उभी केली जात आहे. त्यामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचणे, आरोपी फरार होणे यासह इतरही बाबींना आळा बसणार आहे.

...................

३० चारचाकी, ४८ दुचाकी वाहनांची मागणी

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अकोला पोलीस दलात ९ चारचाकी वाहने दाखल झाली आहेत. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी ३० चारचाकी वाहने व ४८ दुचाकी वाहने देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे. या अद्ययावत वाहनांमुळे पोलिसांना आपले कर्तव्य अधिक गतीने बजाविण्यासाठी मदत होणार आहे.

 

५५ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

राज्यातील इतर जिल्ह्यांसह अकोला जिल्ह्याचेही सध्या ‘जिओ टॅगिंग’ केले जात आहे. त्याचबरोबर ‘सेंट्रलाइज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची याबाबत प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. अकोला जिल्हा पोलीस दलातील दोन अधिकारी, १८ वायरलेसचे कर्मचारी व इतर विभागाचे २० पोलीस कर्मचारी अशा प्रकारे एकूण ५५ पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

 

पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा

जिल्ह्यातील कुठल्याही गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलिसांची मदत हवी असल्यास त्यांनी ११२ नंबर डायल करायचा आहे. त्यापुढच्या अवघ्या १० मिनिटांमध्ये पोलीस मदतीला धावून येतील, असे नियोजन करणे सुरू आहे.

नवा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, लवकरच ही सुविधा जिल्हाभरात पुरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली.

 

गेल्या काही वर्षांत पोलीस दल अधिक ‘हायटेक’ करण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून सातत्याने केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुठेही घटना घडल्यास त्याठिकाणी पोलीस तत्काळ पोहोचावेत, यासाठी ११२ हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. यासाठी अकोला पोलिसांनी पूर्ण प्रशिक्षण घेतले असून, ही हेल्पलाईन सुरू होताच पूर्ण प्रतिसादाने अकोला पोलीस कार्यरत होणार आहेत.

- जी श्रीधर

जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस