शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अकोटच्या दिव्यांग धिरजने वानरलिंग सुळक्यावर फडकावला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 12:19 IST

सुमारे ४५० मीटर उंच असलेला वानरलिंगी सुळका अवघ्या २ तास १५ मिनिटांत २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनी सर केला.

- विजय शिंदे

अकोटअकोला जिल्ह्यातील अकोट येथील गियार्रोहक धिरज कळसाईत यांनी महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील नानेघाटात वसलेला अतिशय अवघड असा, जमिनीपासुन सुमारे ४५० मीटर उंच असलेला वानरलिंगी सुळका अवघ्या २ तास १५ मिनिटांत २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनी सर केला. याठिकाणी तिरंगा फडकविला, राष्ट्रगित व सलामी दिली.सर्वोच्च उंच हिमशिखर माऊंट एव्हरेस्ट मोहीमेवर जाण्याचा संकल्प धिरजने व्यक्त केला आहे.महाराष्ट्रातील वानरलिंगी सुळका भल्या भल्या गियार्रोहकांना आवाहन देणारा कडा आहे.जमिनीपासुन सुमारे ४५० मीटर उंच असलेला हा सुळका सरळ ९० अंश कोनात ताठ मानेने उभा आहे. या सुळक्याची गणना गियार्रोहण क्षेत्रात अतिकठीण श्रेणीत केली जाते. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून 3 तासांची अतिशय दमछाक करावी लागते.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, सुळक्यावर तिरंगा फडकावण्याचा मानस राखुन, धिरज आणि त्यांचे सहकारी शनिवारी २५ जानेवारी रात्री ९ च्या सुमारास पुण्याहून जुन्नरला निघाले. २६ जानेवारी सकाळी सुमारे ६ वाजता वानरलिंगी सुळका प्रस्तरोहन चालू केले. सुळक्याची ९० अंशाची ठेवण हेच याचे वैशिष्ट्य. त्यामुळे ही चढाई अतिशय कठीण होऊन जाते. पण या सगळ्याचा विचार केला तर तो धिरज कसला. अनेक मोहीमांचा अनुभव असलेल्या धिरजने अवघ्या २ तास १५ मिनिटांत हा सुळका सर केला.धिरज कळसाईत सोबत बाल गियार्रोहक साई कवडे ,महाराष्ट्र पोलिस दलातील तुषार पवार यांनी पॉईंट ब्रेक अ‍ॅडव्हेन्चर टिम सोबत होते. एका पायाने व हाताने दिव्यांग असून आतापर्यंत कळसूबाई शिखर, लिंगाना सुळका, कळकराई सुळका आणि खडतर असा वजीर सुळका सर केला असुन महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर यशस्वीरित्यागियार्रोहण केले आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आॅफ्रीकेतील माऊंट किली मंजारो (उंची ५८९५मीटर) हे हिमशिखर २६ जानेवारी २०१९ रोजी आणि रशियातील माऊंट एलब्रुस ( उंची ५६४२ मीटर ) हेहिमशिखर १५ आॅगस्ट २०१९ रोजी यशस्वीरित्या सर केले आहेत. त्यांची दखल घेत इंडिया व महाराष्ट्र बुकांत त्यांची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTrekkingट्रेकिंगakotअकोट