शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांचे २९ ला मुंबईत धरणे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 13:01 IST

सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी २९ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा येथे करण्यात आली.

अकोला: महाराष्ट्र शासनाच्या २ आॅगस्ट १९ च्या परिपत्रकानुसार राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील जाचक अटी रद्द करणे व शंभर टक्के सहायक अनुदान मंजूर करण्यासाठी राज्यातील महापालिकेच्या सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांचा मेळावा शनिवारी अकोल्यात पार पडला. शासनाच्या कंत्राटी कर्मचारी पद्धतीला कडाडून विरोध करण्यासाठी आणि सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी २९ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा येथे करण्यात आली.राज्य शासनाच्या कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्याच धर्तीवर राज्यातील ३५० नगर पंचायती आणि २८ महापालिकेतील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सर्व कंत्राटी कर्मचाºयांना कायम करावे, नियमित सेवा विभागात कंत्राटी पद भरण्यात येऊ नये, आश्वासित पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, मयत कामगाराच्या वारसाला २० लाख रुपये पेन्शन अनुदान द्यावे, पोलीस कर्मचाºयांप्रमाणे मनपा कामगारांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय सेवा द्यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये समान वेतन समान काम देण्यात यावे, मासिक वेतन महिन्याच्या ७ तारखेच्या आत द्यावे, नगरपालिकेच्या सीईओ पदाच्या अधिकाºयास मनपाच्या उपायुक्त पदापर्यंत पदोन्नती दिली जाते; मात्र इतर अधिकाºयांना अधीक्षक पदापुढे जाता येत नाही, ही अट शिथिल करावी, सफाई कामगारांना घरकुल योजनेत सहभागी करून घ्यावे, कामगार संघटनेच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २९ आॅगस्ट रोजी मुंबईत लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येईल. त्याची दखल घेण्यात आली नाही तर साडेचार लाख कामगार कुटुंबीय आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालतील, असे ठराव अकोल्यातील मेळाव्यात घेण्यात आले. अकोला महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेला राज्यव्यापी मेळावा चरणसिंग टाक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन आमदार रणधीर सावरकर आणि आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर विजय अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे अ‍ॅड. सुरेश ठाकूर, रामगोपाल मिश्रा, विश्नाथ घुगे, अ‍ॅड. सुखदेव काशीद, राजन सुतार, बबन झिजुर्डे, शब्बीर विद्रोही, अकोल्यातील पी.बी. भातकुले, अनुप खरारे, विठ्ठलराव देवकते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAazad Maidanआझाद मैदानMumbaiमुंबईagitationआंदोलन