शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून निघणार श्रीरामनवमी समितीची धर्मजागरण यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 15:42 IST

अकोला : श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने यंदा अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून मातृशक्ती, धर्मजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १० मार्च रोजी मोठे राममंदिर येथून सकाळी ७ वाजता ५५० किमीच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्दे१० मार्च रोजी मोठे राममंदिर येथून सकाळी ७ वाजता ५५० किमीच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे. श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने यावेळी पहिल्यांदाच बुलडाणा जिल्ह्यातही यात्रेद्वारे जनजागृती केली जाणार आहे. यंदा २५ मार्च रोजी श्रीरामनवमी असून, त्यानुषंगाने सूर्यनारायणाचे सात अश्वांवर आरूढ प्रतिमेचे १८ मार्च रोजी वितरण केले जाणार आहे.

अकोला : श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने यंदा अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून मातृशक्ती, धर्मजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १० मार्च रोजी मोठे राममंदिर येथून सकाळी ७ वाजता ५५० किमीच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे. शहरातील व परिसरातील असंख्य रामसेवक तसेच महिला अकोला ते सुपो पळशी येथे जाण्यासाठी निघणार आहेत.श्रीरामनवमीच्या पृष्ठभूमीवर दरवर्षी शोभायात्रा समितीच्यावतीने धर्मजागरण यात्रेचे आयोजन केले जाते. यंदा २५ मार्च रोजी श्रीरामनवमी असून, त्यानुषंगाने सूर्यनारायणाचे सात अश्वांवर आरूढ प्रतिमेचे १८ मार्च रोजी वितरण केले जाणार आहे. मूर्तींचे अनुष्ठान करण्यासाठी मातृशक्तींचा सहभाग असणाºया धर्मजागरण यात्रेला १० मार्चपासून सुरुवात केली जाणार आहे. श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने यावेळी पहिल्यांदाच बुलडाणा जिल्ह्यातही यात्रेद्वारे जनजागृती केली जाणार आहे. त्यामध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ, अकोला पूर्व, बाळापूर, जळगाव जामोद, मलकापूर व खामगाव मतदारसंघाचा समावेश राहणार आहे. यात्रेच्या दरम्यान ठिकठिकाणी श्रीरामांचे पूजन केले जाणार आहे. जिल्ह्यात २५ ठिकाणी, तर आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली २२ ठिकाणी, आ. चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनात पाच ठिकाणी तसेच आ. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली सहा ठिकाणी धर्मजागरण यात्रेचे स्वागत केले जाणार आहे.

शोभायात्रा समिती सरसावली!श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष महादेवराव हुरपडे, आ. गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच अकोला-बुलडाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात धर्मजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी कैलाश अग्रवाल, अशोक गुप्ता, वसंत बाछुका, भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, ब्रिजमोहन चितलांगे, डॉ. संजय सोनावणे, डॉ. अभय जैन, रमेश कोठारी, गिरीश जोशी, अनिल मानधने, अनिल थानवी यांच्यासह असंख्य रामसेवक कामाला लागले आहेत.

टॅग्स :Akolaअकोला