अकोला: सीबीएसई वेस्ट झोन हॉकी स्पर्धेचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डी.डी. तुलशान एज्युकेशनचे अध्यक्ष संजय तुलशान यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.सीबीएसईच्या दरवर्षी क्रीडा स्पर्धा होतात. यंदा पहिल्यादांच एमराल्ड स्कूलला राष्ट्रीय (पश्चिम विभाग) हॉकी स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आदी राज्यातील खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांच्यावतीने करण्यात आली आहे. स्पर्धेत १४ व १९ वर्षाआतील मुले व मुली सहभागी होणार आहेत. स्पर्धेत वेस्ट झोनमधील ३५ शाळा संघाचे ५५0 हॉकीपटू सहभागी होणार आहेत. एमराल्ड हाईटस स्कूलच्या मैदानावर होणार्या उद्घाटन सोहळय़ाला धनराज पिल्ले यांच्यासह सीबीएसई संयुक्त क्रीडा व्यवस्थापक डॉ. पुष्कर वोरा, सीबीएसई क्रीडा निरीक्षक संजीव त्यागी, इंद्रजित बासू उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा १८ नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचे शाळा संचालिका अल्पा तुलशान यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य खुशाल थानवी उपस्थित होते. रिअल रँचो मुलांशी बोलणार!'थ्री इडियट' या गाजलेल्या हिंदी चित्रपटाची कथा ज्या शास्त्रज्ञावर लिहिलेली आहे, असा रिअल रँचो मुलांशी संवाद साधण्यासाठी स्पर्धेनिमित्त अकोल्यात येणार आहे. शेख उस्मान शेख जहांगीर असे या रिअल रँचोचे नाव असून, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३0 वाजता शालेय विद्यार्थ्यांशी वैज्ञानिक प्रयोग कसे करायचे, याबाबत प्रात्यक्षिकासह सांगणार आहेत. हा कार्यक्रम अकोल्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी असून, प्रवेश मोफत आहे.
धनराज पिल्ले रविवारी अकोल्यात
By admin | Updated: November 13, 2015 02:15 IST