शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी धनगर समाजाने संघटित व्हावे -अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:03 IST

अकोला: महाराष्ट्रातच नव्हे, तर जिल्ह्यात धनगर समाज बहुसंख्य असूनसुद्धा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आरक्षण, सत्तेपासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. धनगर समाजाने आता जागरूक आणि संघटित झाले पाहिजे, असे मत प्रा. अंजली आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

अकोला: महाराष्ट्रातच नव्हे, तर जिल्ह्यात धनगर समाज बहुसंख्य असूनसुद्धा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आरक्षण, सत्तेपासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. धनगर समाजाने आता जागरूक आणि संघटित झाले पाहिजे, असे मत प्रा. अंजली आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.धनगर समाज संघटनेच्यावतीने आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित मेळाव्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन विकास आघाडीचे राज्य नेते माजी आमदार हरिदास भदे होते.प्रमुख अतिथी म्हणून लातूर लोकसभेचे उमेदवार राम गारकर, आमदार बळीराम सिरस्कार, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, नाशिकचे विनायकराव काळदाते, बळीराम चिकटे, अ‍ॅड. संतोष रहाटे, वसंतराव मुरळ, दिनकरराव पातोंड, नारायणराव ढवळे गुरुजी, श्रीकृष्ण जुमडे, रमेश उभे गुरुजी, देवानंद नवलकार, रमेश पाली, बंडूभाऊ भदे, वसंतराव भदे, गजानन दोड, जि. प. सभापती देवका पातोंड, जि. प. सदस्य गोपाल कोल्हे, बाळापूर पं. स. सभापती मंगला तितूर, लीला गावंडे, पुष्पा गुलवाडे, उषा मुरळ, दीपा भदे व उज्ज्वला जुमडे उपस्थित होते.प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या, सत्तेपासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याची उत्तम संधी आहे. बहुजन समाजाला सत्ता मिळाली पाहिजे, यासाठीच अ‍ॅड. आंबेडकरांनी वंचित बहुजन विकास आघाडीची मोट बांधली आहे. सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून धनगर समाजाने वादळ निर्माण केले आहे. हे वादळ लोकसभेपर्यंत पोहोचले पाहिजे, असे यावेळी सांगितले.माजी आ. हरिदास भदे यांनी ज्यांना आरक्षणाची गरज नव्हती, त्यांना भाजप सरकारने आरक्षण दिले आणि धनगर समाज अनेक वर्षांपासून आरक्षण मागत असूनही आरक्षण मिळत नाही. प्रस्थापित व सत्ताधाºयांना आमची केवळ मते हवी आहेत, हे आता धनगर समाजाने लक्षात घेऊन आपले धोरण ठरविण्याची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले. त्यावेळी आमदार बळीराम सिरस्कार यांनीसुद्धा बहुजन समाजाने संघटित होऊन आपली ताकद दाखवावी, असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन दिनकर नागे यांनी केले. आभार मोहन रोकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज करणकार, अभिजित नवलकार, अमोल भदे, गजानन वसतकार, श्रीकांत चिकटे, संतोष कात्रे, सचिन बचे, चंदू बोरसे, संदीप जुमडे, बंडू बोळे, प्रज्योत नागे व विजय पुंडे यांनी प्रयत्न केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDhangar Reservationधनगर आरक्षणBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ