शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

भाविकांनी केला ऑनलाइन श्वासानंद नामजप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 11:53 IST

Mehkar News श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात गुरुपीठाधीश ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या हस्ते अभियानाची साधेपणाने सांगता करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संत बाळाभाऊ महाराज पितळे यांच्या भक्तांतर्फे दरवर्षी राज्यभर राबविल्या जाणारे श्वासानंद नामजप अभियान यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे ऑनलाइन पद्धतीने झाले. या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाला. ५ डिसेंबर रोजी मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात गुरुपीठाधीश ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या हस्ते अभियानाची साधेपणाने सांगता करण्यात आली.   १९व्या शतकातील संत बाळाभाऊ महाराज उर्फ श्वासानंद माउली यांची इतिहासात ‘महाराष्ट्राच्या धर्मक्रांतीचे प्रणेते’ म्हणून ओळख आहे. त्यांच्या परंपरेचे चौथे अधिपती ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांनी गुरुगादीची धुरा सांभाळल्यानंतर श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात अनेक अभिनव उपक्रमांची भर घातली. तरुणांच्या मनावर चंगळवाद आणि व्यसनाधीनतेचा पगडा बसू नये, म्हणून आध्यात्मिक संस्कार करण्यासाठी त्यांनी नामजप अभियानाची सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणेने दरवर्षी चातुर्मासात महाराजांचे भक्त मोठ्या प्रमाणात ‘ओम ब्रह्मी श्वासानंदाय नमः’ या महामंत्राचा नामजप करतात. तरुणांचा यामध्ये हिरीरीने सहभाग असतो. दरवर्षी या अभियानाच्या नोंदपुस्तिका महाराष्ट्रात सर्वत्र वितरीत केल्या जातात. गेल्यावर्षी मुंबईपासून चंद्रपूरपर्यंत ५२९ गावांतल्या भक्तांनी हे अभियान राबविले होते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान थेटपणे न राबविता ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. लाॅकडाऊनच्या काळात मोठी सवड मिळाल्यामुळे हजारो भाविकांनी या अभियानात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. 

यज्ञहवनाचा कार्यक्रम रद्द     २५ नोव्हेंबरला राज्यस्तरीय अभियान समितीचे संयोजक सुरेश बोचरे, सहसंयोजक श्रीरंग सावजी, श्वासानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष आशिष उमाळकर यांच्या पुढाकारातून समितीच्या सर्व सदस्यांची व्हर्च्युअल मिटिंग झाली. त्यामध्ये गर्दी टाळण्याच्या दृष्टीने दरवर्षी होणारा यज्ञहवनाचा कार्यक्रम रद्द करून अभियानाची साधेपणाने सांगता करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात संत बाळाभाऊ महाराजांच्या मूळ पादुकांचे पूजन करून सद्गुरु ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या हस्ते श्वासानंद नामजप अभियानाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Mehkarमेहकरbuldhanaबुलडाणा