शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हद्दवाढीत समाविष्ट नवीन प्रभागातील विकास कामे लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:55 IST

मनपा प्रशासनाने ५९० विकास कामांचा प्रस्ताव तयार करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजूरीनंतर प्रशासकीय मंजूरीसाठी शासनाकडे नुकताच सादर केल्याची माहिती आहे.

अकोला : महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन शहरालगतच्या २४ गावांचा मनपात समावेश करण्यात आला. तत्कालीन ग्रामपंचायतच्या कालावधीत या भागात मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विकास कामांचा अनुशेष दुर करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनावर आली. याकरीता शासनाने ११० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला. मनपा प्रशासनाने ५९० विकास कामांचा प्रस्ताव तयार करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजूरीनंतर प्रशासकीय मंजूरीसाठी शासनाकडे नुकताच सादर केल्याची माहिती आहे.शहराच्या अपुºया भौगोलिक क्षेत्रफळामुळे विकासाला अडथळा निर्माण झाला होता. जमिनींचे भाव वधारल्यामुळे बांधकाम व्यावसायीकांनी शहरालगतच्या गावांमध्ये मनमानी पध्दतीने अनधिकृत बांधकामांचा सपाटा लावला होता. शहरालगतच्या २४ गावांचा महापालिकेच्या सोयी-सुविधांवर ताण पडत असल्यामुळे मनपा प्रशासनाने शासनाकडे वारंवार हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. या गावांमध्ये ले-आऊट नसल्यामुळे प्रशस्त रस्ते, नाल्या, सर्व्हीस लाईन, पथदिव्यांसह पाणीपुरवठ्याची समस्या कायम होती. ही बाब लक्षात घेता अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी हद्दवाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. हद्दवाढीच्या प्रस्तावाला शासनाने मंजूरी दिल्यानंतर हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांसाठी आ.रणधीर सावरकर यांनी शासनाकडे ११० कोटींचा विकास आराखडा सादर केला. त्यापैकी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटींचा आराखडा मंजूर करीत २० कोटींच्या निधीला मंजूरी दिली आहे. मनपा प्रशासनाने या भागातील विकास कामांचे ६१० प्रस्ताव तयार क रीत जिल्हाधिकाºयांकडे सादर केले होते. जिल्हाधिकाºयांनी यापैकी ५९० प्रस्तावांना मंजूरी दिल्यानंतर प्रशासकीय मंजूरीसाठी नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.0.७५ टक्के दराने अदा होईल शुल्कशासनाच्या निर्देशानुसार विकास कामांचे प्रस्ताव तपासण्यासाठी मनपाने त्रयस्थ यंत्रणा (थर्ड पार्टी इन्सपेक्शन)म्हणून अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड केली. या यंत्रणेने प्रस्तावांची तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आले. यातील ५९० प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. संबंधित विकास कामांचा दर्जा तपासणे, अहवाल सादर करणे आदी कामांसाठी शासकीय अभिययांत्रिकी महाविद्यालयाला 0.७५ दरानुसार शुल्क अदा केले जाईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका