शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्ह्यातील ६३ कोटींच्या विकासकामांना लागला ‘ब्रेक’

By संतोष येलकर | Updated: March 19, 2024 14:57 IST

या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध यंत्रणांच्या जिल्ह्यातील ६३ कोटी रुपये किमतीच्या नवीन विकासकामांना ‘ब्रेक’ लागला आहे.

अकोला : अकोला लोकसभा मतदारांघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या कालावधीत कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) बाकी असलेली विकासकामे सुरू करता येणार नाहीत. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध यंत्रणांच्या जिल्ह्यातील ६३ कोटी रुपये किमतीच्या नवीन विकासकामांना ‘ब्रेक’ लागला आहे.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनांतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध योजना आणि विकासकामांसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यापैकी १३ मार्चपर्यंत १८७ कोटी रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च करण्यात आला असून, उर्वरित ६३ कोटी रुपयांचा निधी खर्च होणे बाकी असतानाच, अकोला लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १६ मार्चपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. अखर्चित निधीतील ‘वर्क ऑर्डर’ देण्याची प्रक्रिया बाकी असलेली विकासकामे आचारसंहितेच्या कालावधीत सुरू करता येणार नाहीत. त्या अनुषंगाने आचारसंहितेच्या अंमलबजावणीत विविध यंत्रणांची जिल्ह्यातील प्रस्तावित नवीन विकासकामे आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत थांबविण्यात आली आहेत.२५० कोटी यंत्रणांना वितरित!जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी मंजूर २५० कोटी रुपयांचा निधी १५ मार्चपर्यंत संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये महानगरपालिकासह जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्यसेवा, महावितरण, क्रीडा विभाग, पोलिस विभाग आदी यंत्रणांचा समावेश आहे.

‘या’ कामांसाठी मंजूर आहे निधी!जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यात रस्ते, नाल्या, जलसंधारण, शिक्षण, आरोग्यसेवा, वीजपुरवठा, पशुसंवर्धन, क्रीडा आदी विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लागणार कामे!अकोला लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. त्यानुसार, आचारसंहितेत ‘ब्रेक’ लागलेली जिल्ह्यातील विकासकामे आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लागणार आहेत.

टॅग्स :Code of conductआचारसंहिताAkolaअकोलाElectionनिवडणूक