शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीतील विकास कामे; त्रयस्थ यंत्रणेचे मूल्यमापन संशयास्पद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 10:01 IST

त्रयस्थ यंत्रणा व महापालिकेचे मूल्यमापन संशयाच्या घेºयात सापडले आहे.

- आशिष गावंडेअकोला: शहराच्या हद्दवाढ परिसरातील विकास कामांचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी त्रयस्थ यंत्रणेची असून, त्यांच्या तपासणी अहवालानंतरच कंत्राटदारांची देयके अदा केली जात असल्याची सोयीस्कर भूमिका मनपा प्रशासनाकडून घेतली जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार मनपाने त्रयस्थ यंत्रणा (थर्ड पार्टी इन्स्पेक्शन) म्हणून अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती केली आहे. हद्दवाढ भागात अवघ्या दोन-दोन दिवसांत डांबरी रस्त्यांचे निर्माण कसे होऊ शकते, असा सवाल उपस्थित होत असल्यामुळेच त्रयस्थ यंत्रणा व महापालिकेचे मूल्यमापन संशयाच्या घेºयात सापडले आहे.शहराच्या हद्दवाढ परिसरातील विकास कामांसाठी महापालिकेला शासनाकडून ९७ कोटी ३० लाख रुपये प्राप्त झाले असून, आज रोजी पहिल्या टप्प्यात ५५ कोटी ४८ लाख रुपये किमतीची कामे सुरू आहेत. मागील पाच महिन्यांच्या कालावधीत संबंधित कंत्राटदारांनी ४५९ प्रस्तावित कामांपैकी केवळ ३४ रस्त्यांची कामे निकाली काढली. उर्वरित नाल्या, पथदिवे, जलवाहिनीची कामे अर्धवट करून ठेवली आहेत. हद्दवाढीतील विकास कामांवर देखदेख ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली असली तरी कंत्राटदारांच्या मनमानीसमोर मनपाच्या बांधकाम विभागाने अक्षरश: गुडघे टेकल्याची परिस्थिती आहे. यादरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार मनपाने विकास कामांच्या दर्जाची त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती केली. सदर यंत्रणेकडून रस्त्यांच्या गुणवत्ता तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच देयक अदा केले जात असल्याची सोयीस्कर भूमिका मनपाकडून घेतली जात आहे.आयुक्त साहेब, विकास कामांची पाहणी कधी?हद्दवाढ क्षेत्रात कोट्यवधींच्या विकास कामांना मार्च महिन्यात सुरुवात झाली. या विकास कामांची पाहणी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी किती वेळा केली, असा सवाल उपस्थित झाला आहे. यासंदर्भात त्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते व्यस्त असल्याचा संदेश मिळाला.लोकप्रतिनिधी, महापौरांचे दुर्लक्ष का?हद्दवाढ भागात तीन बड्या कंत्राटदारांनी कामे घेतली आहेत. विकास कामांच्या गुणवत्तेची पाहणी करून संबंधित तीनही कंत्राटदारांसह मनपाच्या जबाबदार अधिकाऱ्यांसोबत आजपर्यंतही भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महापौरांनी बैठक घेऊन कानउघाडणी केल्याचे ऐकीवात नाही. या विषयाकडे लोकप्रतिनिधी व महापौर लक्ष देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्रयस्थ यंत्रणेला ७० लाख कशासाठी?हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांच्या दर्जाचे तांत्रिक लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयावर सोपविण्यात आली आहे. याबदल्यात यंत्रणेला मनपाला प्राप्त एकूण निधीच्या बदल्यात ०.७० दरानुसार अर्थात ७० लाख रुपये अदा केले जातील. सदर यंत्रणेकडून प्रामाणिकपणे विकास कामांची गुणवत्ता तपासल्या जात नसेल, तर ७० लाखांची उधळण कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका