शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

२५0 कोटींच्या विकास आराखड्याला ग्रहण!

By admin | Updated: March 7, 2017 02:31 IST

मनपाला जमा करावा लागेल ५0 कोटींचा हिस्सा

आशिष गावंडे अकोला, दि. ६- महापालिका क्षेत्रात समाविष्ठ झालेल्या नवीन प्रभागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी शिवसेना वगळता सत्ताधारी भाजपसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनी २५0 कोटींच्या प्रस्तावाला ४ जानेवारी रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली होती. प्रशासनाचा ठराव शासनाने मंजूर केल्यास २५0 कोटींमध्ये २0 टक्क्यानुसार ५0 कोटी रुपये हिस्सा पालिकेला जमा करावा लागेल. मनपाची आर्थिक क्षमता पाहता नवीन प्रभागाच्या विकास आराखड्याला ग्रहण लागण्याची चिन्हे आहेत. शहर हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव महापालिकेच्या वतीने २00२ मध्ये शासनाकडे सादर करण्यात आला होता. मनपा प्रशासनाद्वारे उपलब्ध सोयी- सुविधांवर शहरालगतच्या गावांचा ताण पडत असल्यामुळे शहराची हद्दवाढ करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. मनपा प्रशासनानेदेखील हद्दवाढीच्या प्रस्तावाला शासन दरबारी रेटून धरले. परिणामी ३0 ऑगस्ट २0१६ रोजी शासनाने मनपा क्षेत्राच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी करीत १३ प्रमुख ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपामध्ये समावेश केला. नवीन प्रभागात प्रशस्त रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठय़ाची सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे मध्यंतरी आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी विकास कामांसाठी २५४ कोटींचा आराखडा मनपाकडे सादर केला होता. नवीन प्रभागांमध्ये विकास कामांची निकड लक्षात घेता मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने टिप्पणी तयार करून ४ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत सादर केली होती. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी शहरात समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागाच्या विकासासाठी २५0 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मांडला असता मित्र पक्ष शिवसेना वगळता इतर सर्व राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी प्रस्तावाचे सर्मथन केले होते. लोकप्रतिनिधींवर भिस्त!हद्दवाढीनंतर मनपात सामील झालेल्या भागात विकास कामांसाठी शासनाकडून विशेष अनुदान प्राप्त होते. प्रशासनाने २५0 कोटींचा ठराव शासनाकडे पाठविल्यास त्यामध्ये २0 टक्के रकमेच्या अटीनुसार ५0 कोटींचा हिस्सा जमा करावा लागेल. शासनाकडून प्राप्त अनुदानात वाढ करून घेण्यासह मनपाचा हिस्सा कसा वगळता येईल, यासाठी स्थानिक आमदारांना शासन दरबारी पुढाकार घ्यावा लागणार आहे.सत्ताधारी-प्रशासनात हवा समन्वयशहर विकासासाठी शासनाकडून पुन्हा एकदा निधीचा ओघ सुरू होण्याची चिन्हे आहेत. दज्रेदार कामे पूर्ण करण्यासाठी मनपातील सत्ताधारी व प्रशासनामध्ये समन्वय असावा, अशी अकोलेकरांची अपेक्षा आहे.स्वत: तयार केले नकाशे!आमदार रणधीर सावरकर मूळचे अभियंता आहेत. त्यांनी स्वत: मनपात सामील २४ गावांचे नकाशे तयार करून विकास आराखडा मनपाकडे सादर केला आहे. त्यामध्ये मुख्य रस्त्यांसह प्रत्येक गल्लीबोळांची लांबी-रुंदी किती, त्यावर अपेक्षित पथदिव्यांची संख्या, जलवाहिनीचे जाळे, स्मशानभूमीची जागा, नागरिकांसाठी ह्यओपन स्पेसह्ण, मुलांसाठी खेळाची मैदाने या सर्व बाबींचा अंतर्भाव केल्याची माहिती आहे.