शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

स्मशानभूमींचा विकास, रस्त्यांची कामे रेंगाळली

By admin | Updated: May 6, 2015 01:01 IST

५.७२ कोटींची कामे केव्हा पूर्ण होणार?

संतोष येलकर/अकोला : जनसुविधा योजनेंतर्गत जिल्ह्यातील स्माशानभूमी विकास, स्मशानभूमी शेड आाणि सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांसाठी जिल्ह्यातील १८0 ग्रामपंचायतींना चार महिन्यांपूर्वी ५ कोटी ७२ लाखांचा निधी जिल्हा परिषदमार्फत वितरित करण्यात आला; मात्र या निधीतून स्मशानभूमी विकासाची कामे पूर्ण करण्यात आल्याबाबतचा अहवाल जिल्हय़ातील एकाही पंचायत समितीकडून अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे निधी वितरित करण्यात आला असला तरी, रेंगाळलेली स्मशानभूमी विकासाची कामे ग्रामपंचायतींकडून केव्हा पूर्ण होणार, याबाबतचा प्रश्न निर्माण होत आहे.सन २0१४-१५ यावर्षी जनसुविधा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर व तेल्हारा इत्यादी सातही तालुक्यात स्मशानभूमी विकास, स्मशानभमूी शेड व सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांसाठी १८0 ग्रामपंचायतींकरिता ५ कोटी ७२ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) मंजूर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी २ कोटी ५0 लाख आणि १३३ लहान ग्रामपंचायतींसाठी ३ कोटी २२ लाखांच्या निधीसह एकूण १८0 ग्रामपंचायतींना ५ कोटी ७२ लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. उपलब्ध झालेला हा निधी संबंधित ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी ८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदमार्फत सातही पंचायत समितीस्तरावर वितरित करण्यात आला. जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमींच्या विकास कामांसाठी पंचायत समित्यांकडून ग्रामपंचायतींना निधी वितरित करण्यात आला. निधी उपलब्ध असताना गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १८0 ग्रामपंचायती अंतर्गत स्मशानभूमी विकास, रस्ते व स्मशानभूमी शेडची कामे अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही.काही ग्रामपंचायतींकडून कामाना अद्याप सुरुवातही करण्यात आली नसल्याची माहिती आहे. कामे पूर्ण झाल्याबाबतचा अहवाल जिल्ह्यातील एकाही पंचायत समितीकडून २ मे पर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्त झाला नाही.त्यामुळे जनसुविधा अंतर्गत जिल्ह्यातील स्मशानभूमींच्या विकासाची रेंगाळलेली कामे ग्रामपंचायतींकडून केव्हा पूर्ण होणार, याबाबतचा प्रश्न निर्माण होत आहे.