शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात १११ जलमार्ग विकसित करणार- गडकरी

By admin | Updated: April 5, 2016 01:34 IST

वाशिम-हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन.

वाशिम : देशात सध्या रस्ते, रेल्वेच्या मार्गानेच वाहतूक करण्यात येते. ही वाहतूक खर्चिक असून, यापेक्षा कितीतरी पटीने जलवाहतूक स्वस्त आहे. म्हणूनच विकसित देशांमध्ये जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येते. याच उद्देशाने भारतातही १११ नद्यांना जलमार्ग म्हणून विकसित करण्याचा संकल्प सरकारने सोडला असून, त्याकरिता एक लाख कोटी रुपयांची तरतूद करून करण्यात आली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारा सोमवारी वाशिम येथे आयोजित वाशिम-हिंगोली जिल्ह्यातील ६७९१ कोटी रुपयांचे रस्ते, उड्डाणपूल विकास कामांच्या कोनशिला अनावरणप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.शेतकर्‍यांना संकटांचा सामना करावा लागत असून, शेतमालाचे उत्पादन घटत आहे. शेतीला पाणी मिळत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांचा सर्वांगीन विकास शक्यच नाही, असे स्पष्ट करून, पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी सर्वांनीच पुढे येण्याचे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. देशातील १११ नद्यांना जलमार्ग म्हणून विकसित करण्यास लोकसभेने मान्यता दिली असून, त्यासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील २0 नद्यांच्या बाजूला वॉटर प्लँट विकसित करावयाचा असून, येथे पर्यटन विकसीत होऊ शकेल. या नद्यांमध्ये वर्षभर तीन मीटर पाणी राहिल, असे तंत्रज्ञान विकसित केले जाईल. जलवाहतुकीमुळे वाहतुकीच्या खर्चात मोठी बचत होईल. रस्ते, रेल्वे यापेक्षाही जलवाहतूक स्वस्त व सुलभ आहे. परदेशात जवळपास ४0 टक्के प्रवासी आणि माल वाहतूक पाण्यातून होते. भारतात हे प्रमाण केवळ ३.५ टक्के असून, ते वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, खा. राजीव सातव, खा. संजय धोत्रे, खा. प्रतापराव जाधव, आमदार राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. श्रीकांत देशपांडे, आ. अमित झनक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. खासदारांची कोपरखळीसेना-भाजपच्या ताणलेल्या संबंधांचा धागा पकडत, काँग्रेसचे खासदार राजीव सातव म्हणाले, आम्ही १५ वर्षे सत्तेत होतो, आता विरोधकांची भूमिका कशी पार पाडावी, हे शिवसेनेकडून शिकायला मिळत आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, विरोधकाची भूमिका काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यात ठासून भरली आहे. काँग्रेसमध्ये एका नेत्याचा दुसर्‍या नेत्याला हमखास विरोध असतो. काँग्रेसमध्ये एकमेकांनाच विरोध करण्याचे प्रमाण जास्त असल्याने, त्यांना विरोधकाची भूमिका शिवसेना शिकवूच शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.