शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

‘शॉक थेरपी’ असूनही रुग्ण रेफर टू नागपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:27 IST

अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागात ‘शॉक थेरपी’ची सुविधा असूनही बहुतांश रुग्ण नागपूर येथे पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागात ‘शॉक थेरपी’ची सुविधा असूनही बहुतांश रुग्ण नागपूर येथे पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागात असलेली शॉक थेरपीसाठी ईसीटी मशीन मागील काही दिवसांपासून धूळ खात पडली आहे. रुग्णांवर उपचारासाठी येथे एमडी डॉक्टर आणि अ‍ॅनेस्थिसिया तज्ज्ञही उपलब्ध आहेत. या सर्व आवश्यक सुविधा असूनही येथे मनोविकृती रुग्णांना थेट नागपूरला पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.एकाही रुग्णावर उपचार नाही!मनोविकृती विभागात ईसीटी मशीन दाखल झाल्यापासून एकाही रुग्णावर या मशीनचा उपयोग करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही मशीन आणली तेव्हापासून धूळ खात पडलेली आहे, तर रुग्णांना याच उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात येते.रुग्णसेवक संघटनेचे निवेदनसर्व सुविधा उपलब्ध असूनही येथील मनोविकार रुग्णांना शॉक थेरपीसाठी नागपूर येथे जावे लागत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे महानगराध्यक्ष आशिष सावळे यांनी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांना दिले.

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला