शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट ज्वारीचा प्रश्न विधिमंडळात गाजणार!

By admin | Updated: March 16, 2017 02:34 IST

रणधीर सावरकर यांची लक्षवेधी.

अकोला, दि. १५- शासकीय धान्य गोदामांमध्ये गत वर्षभरापासून पडून असलेल्या निकृष्ट ज्वारीचे जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना वाटप सुरू करण्यात आले आहे. यासंबंधी आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळात लक्षवेधी दाखल केली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट ज्वारी वाटपाचा प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सातही तालुक्यांत हमीदराने ज्वारी खरेदी करण्यात आली होती. अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बाश्रीटाकळी या पाच खरेदी केंद्रांवर १ हजार ५७0 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आलेली ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी गत डिसेंबर २0१५ मध्ये जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो क्विंटल ज्वारीच्या पोत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात सोंड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने, हजारो क्विंटल ज्वारीचे पीठ झाले. वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर शासकीय धान्य गोदामांमधील ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश गत १ डिसेंबर रोजी शासनामार्फत देण्यात आला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत गत २ फेब्रुवारीपासून एक रुपया प्रतिकिलो दराने रास्त भाव दुकानांमधून जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना पीठ झालेल्या निकृष्ट ज्वारीचे वितरण सुरू करण्यात आले. टोकरलेली आणि निकृष्ट ज्वारी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हय़ातील प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारली जात आहे. यासंदर्भात गत ११ फेब्रुवारी रोजी ह्यलोकमतह्णमध्ये वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत जिल्हय़ातील गरीब शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट ज्वारी वितरणाचा प्रश्न आमदार रणधीर सावरकर यांनी ह्यलक्षवेधीह्णद्वारे विधिमंडळात दाखल केला आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ातील निकृष्ट ज्वारी वितरणाचा प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे.जिल्हय़ात गरीब शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट ज्वारीचे वितरण करण्यात येत असल्याच्या प्रश्नावर विधिमंडळाकडे लक्षवेधी दाखल केली आहे. या प्रश्नावर विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात चर्चा होणार आहे. चर्चेत हा प्रश्न लावून धरणार आहे.-रणधीर सावरकर, आमदार.