शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राज्यात नैराश्यातून वाढले आत्महत्येचे प्रमाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 15:48 IST

तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे.

अकोला : महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे वास्तव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नॅशनल हेल्थ प्रोफाईल- २०१९ च्या माध्यमातून समोर आले आहे. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली, तरी नैराश्य हे मोठं कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे.राज्यात शेतकऱ्यांसोबतच तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. आत्महत्येची कारणं वेगवेगळी असली, तरी यातील बहुतांश आत्महत्येचे प्रकार हे नैराश्यातून घडल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या ‘नॅशनल हेल्थ प्रोफाईल-२०१९’मध्ये देशभरातील आत्महत्येचे गंभीर चित्र स्पष्ट केले आहे. अहवालात २०१५ नुसार दिलेल्या राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्रात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पुरुषांची संख्या १२, ६५४, तर ४,३१४ महिला आहेत. यामध्ये ३० ते ४५ वर्षे वयोगटात ४, ६४८ पुरुषांनी, तर १८ ते ३० वर्षे वयोगटातील ३५५९ तरुणांनी आत्महत्या केली आहे.वयोगटानुसार आत्महत्या

वयोगट            पुरुष           महिला१८ ते ३० -       ३५५९ -      १८३१३० ते ४५ -       ४६४८ -     १२३१आत्महत्या करण्यामागे प्रमुख कारण म्हणजे नैराश्य असते. नैराश्यात असलेल्या रुग्णांमध्ये आत्महत्या करण्याची लक्षणे जास्त असतात. या व्यतिरिक्त दारूचे सेवन आणि इतर सामाजिक समस्यांमुळेही आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण आहे; परंतु नैराश्यातून आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे २० ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तिंमध्ये आत्महत्येचे विचार जास्त येतात. या व्यक्तींना समुपदेशनाची गरज असते. प्रेरणा प्रकल्पांतर्गत अशा व्यक्तिंचे सुमपदेशन केले जाते.- डॉ. श्रीकांत वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ, प्रेरणा प्रकल्प, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्या