बुलडाणा : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये १0१ उमेदवारांनी निवडणूक लढविली. यापैकी तब्बल ८१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बसपा, मनसे अशा पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे. बुलडाणा मतदारसंघात केवळ चार उमेदवारांची अनामत वाचली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नरेश शेळके, बसपाचे शंकर चौधरी व भारिपचे अझर खान हे अनामत जप्त झालेल्या उमेदवारांपैकी प्रमुख उमेदवार आहेत.मलकापूर मतदारसंघात १२ उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. केवळ दोघांनाच अपेक्षित मतांचा कोटा गाठता आला. या मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी, बमसं व बसपा उमेदवारांना अनामत वाचविता आली नाही. जळगाव जामोद मतदारसंघात १५ उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ढोकणे व शिवसेनेचे संतोष घाटोळ यांचा समावेश आहे. खामगावमध्ये आठ उमेदवार अनामत वाचवू शकले नाहीत. राष्ट्रवादीचे नानाभाऊ कोकरे व शिवसेनेचे हरिदास हुरसाळ यांची अनामत जप्त झाली. चिखली म तदारसंघात नऊ उमेदवार अनामत वाचवू शकले नाहीत. त्यामध्ये शिवसेनेचे डॉ. प्रतापसिंह राजपूत, मनसेचे विनोद खरपास, भारिपचे विजय खरात यांचा समावेश आहे. मेहकर म तदारसंघात तब्बल १२ उमेदवारांना अनामतचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी, भाजप, भारी प, बसपा या सर्वच पक्षांची अनामत जप्त झाली आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात नऊ उमेदवारांची अनामत गेली. मनसे, बसपा व काँग्रेसचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ८१ उमेदवारांची अनामत जप्त
By admin | Updated: October 20, 2014 00:00 IST