शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जलसंपदा विभाग रिकामा; वरिष्ठ अभियंत्यांसह ९३१ जण एकाच दिवशी सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 11:36 IST

८० अधीक्षक अभियंता, ३५७ कार्यकारी अभियंता, १,६८० उपविभागीय आणि ७,५०० कनिष्ठ अभियंता आहेत.

- राजरत्न सिरसाटअकोला: राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठीचे प्रयत्न करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यासह ९३१ जण रविवारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले. यात वरिष्ठ अनुभवी अभियंत्यांचा समावेश आहे.जलसंपदा (पाटबंधारे) विभागात राज्यात काम करणाऱ्यांमध्ये ८० अधीक्षक अभियंता, ३५७ कार्यकारी अभियंता, १,६८० उपविभागीय आणि ७,५०० कनिष्ठ अभियंता आहेत. नवीन भरती नगण्य आहे. असे असताना आजमितीस उपलब्ध असलेल्या या अभियंत्यांपैकी ८९० अभियंते हे सेवानिवृत्त झाले. इतर कर्मचारी मिळून हा आकडा ९३१ इतका आहे. सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये तीन अधीक्षक अभियंता, ६१ कार्यकारी अभियंता, २०७ उपअभियंता आणि ६२० कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. म्हणजेच आजमितीस या विभागात या अभियंत्यांच्या जागा रिक्त आहेत. लवकरच यातील आणखी काही वरिष्ठ अभियंते सेवानिवृत्त होणार आहेत. सद्यस्थितीत नवीन भरती नगण्य आहे. विदर्भात मोठे, मध्यम तसेच बॅरेजची कामे रखडली आहेत. या सर्व पृष्ठभूमीवर कनिष्ठ अभियंत्यांना मार्गदर्शन करायला अनुभवी वरिष्ठ लागतात. तसेच प्रकल्पाची कामे, नियोजन, डिझाइन अशी अनेक तांत्रिक कामे करावी लागतात. प्रकल्प बांधणे हेदेखील सर्वात महत्त्वाचे काम असल्याने यासाठी अनुभवी अभियंते लागतात, असे या विभागातील तज्ज्ञांचे मत आहे. गतवर्षी मोजक्या कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली. यावर्षी ‘कोविड-१९’मुळे नवीन भरती होईल की नाही, यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. नवीन भरतीमध्ये काही थेट कार्यकारी अभियंते मिळतील; पण त्यांनाही अनुभव घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे सेवानिवृत झालेल्या किंवा होणाºया अनुभवी अभियंत्यांना एक-दोन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. अगोदरच्या शासनाने हे केले आहे. विदर्भ सिंचन विकास मंडळावर कार्यकारी संचालक याच पद्धतीने घेण्यात आले. राज्यात इतर ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला. पाटबंधारे विभागाचे राज्यातील ८९० वरिष्ठ अभियंत्यासह इतर कर्मचारी मिळून ९३१ जण रविवारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे अनुभवी अभियंत्यांची कमतरता निर्माण झाली आहे.-मनोज बोंडे,अध्यक्ष,म. रा. राजपत्रित अभियंता संघटना,अमरावती विभाग.

 

टॅग्स :Akolaअकोला