शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचा शिक्षण विभागाचा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:42 IST

राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे पाठपुरावा करून सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

अकोला: शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तिका, सेवा पट विनामूल्य देण्याबाबत आणि त्यामध्ये नोंदी घेऊन त्या साक्षांकित करण्याबाबत शासनाने तरतूद केली आहे. असे असतानाही शिक्षण विभागाकडून शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यक प्रत मिळत नाही. त्यामुळे राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे पाठपुरावा करून सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी पश्चिम वºहाडातील सर्वच शिक्षणाधिकाऱ्यांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचे निर्देश दिले आहेत.सेवा पुस्तिका हा प्रत्येक कर्मचाºयाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यामध्ये दरवर्षी वेतनवाढीसह कर्मचाºयाच्या नोकरीबाबत सर्व महत्त्वाच्या नोंदी ठेवण्यात येतात. सेवा पुस्तिका नसेल तर सेवानिवृत्ती, बदली, समायोजन करण्यास संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयाला अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना शिक्षक लाभापासून वंचित राहावे लागते. त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तरतूद केली आहे; परंतु शासनाच्या निर्णयाकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे. शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत मिळत नव्हती. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या पगार वाढीची, यासह इतर नोंदीची माहिती मिळत नव्हती. ही समस्या राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मनीष गावंडे यांनी अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे मांडली. तसेच त्यांना निवेदन देऊन शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांनी पश्चिम वºहाडातील सर्वच प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना निर्देश देऊन शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्यास बजावले आहे. सोबतच त्यांनी यासंदर्भात काय कार्यवाही केली, याचा अहवालसुद्धा सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक