शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

परवाने नूतनीकरणास नकार

By admin | Updated: May 9, 2014 00:35 IST

आज ८ मे रोजी हमाल-मापारींनी अचानकपणे कामबंद आंदोलन पुकारल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिली. तर अचानक झालेल्या या बंदमुळे माहितीअभावी शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागला.

 खामगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मापारींचे परवाने नूतनीकरण करण्यास बाजार समितीने नकार दिल्याच्या कारणावरून आज ८ मे रोजी हमाल-मापारींनी अचानकपणे कामबंद आंदोलन पुकारल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिली. तर अचानक झालेल्या या बंदमुळे माहितीअभावी शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागला. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही मापारींना काटेपट्टय़ा समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे; मात्र अनेक मापारींनी काटेपट्टय़ा सादर केल्या नव्हत्या. त्यामुळे बाजार समितीच्या झालेल्या अंकेक्षणात याबाबत मेळ जुळत नसल्याने त्रुटी काढून यामुळे शासनाचे तसेच कृउबासचे नुकसान होत होते. त्यामुळे बाजार समितीच्यावतीने मापारींना काटेपट्टय़ा सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले; मात्र तरीही काटेपट्टय़ा सादर केल्या नव्हत्या. त्यामुळे बाजार समितीने मापारी अ. रहेमान शे. रहेमान, रवी अशोक मोरे, महादेव रामचंद्र तायडे, सै. रिजवान सै. अमीर, अनिल दशरथ जाधव, अंबादास शंकर मुळे, गजानन दामू इंगळे, भगवान बळीराम सहस्त्रबुद्धे, हसनशहा तालेबशहा, देवानंद सहदेव हेलोडे, सुरेश महादेव सिरसाट, संतोष बजरंग गायकवाड, संभाजी विठ्ठल तासतोडे, सुगदेव नामदेव हेलोडे, नामदेव वामन हिवराळे, भारत उत्तम टकले, प्रल्हाद खंडूजी म्हारनारे, वामन मारोती राऊत, तसलीमखा इस्माईलखा, शेख जाकिर शेख नासीर, धम्मपाल उत्तम इंगळे, भारत मसाराम पहुरकार, शाम दगडू सरदार, अनिल लहानू हेलोडे, गोकुल विठ्ठल माटकर, संतोष जनार्दन जाधव, ईश्‍वर सुगदेव तायडे, बापू शंकरराव खोसे, राहुल रामकृष्ण सावंग, जगदेव दगडू हेलोडे, भाऊराव सापुर्डा हेलोडे, शे. अहमद शे. सत्तार, दिनेश रमेश हेलोडे, शाम लक्ष्मण हेलोडे, गणेश किसन चुनेकर अशा एकूण ३७ मापारींना २६ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती; मात्र तरीही काटेपट्टय़ा सादर न झाल्याने कृउबासने काटेपट्टय़ा सादर न करणार्‍या एकूण ३७ मापारींचे परवाने एका आदेशान्वये रद्द केले. त्यामुळे या कारवाईच्या निषेधार्थ मापारींचे परवाने नूतनीकरण करण्यास २४ एप्रिल रोजी नकार दिला होता. त्यामुळे आज ८ मे रोजी हमाल-मापारींनी अचानकपणे कामबंद आंदोलन केले. यामुळे शेतकर्‍यांची मात्र गैरसोय झाली.