मंगरुळपीर (जि. वाशिम), दि. २१ - राज्यात काही ठिकाणी डेंग्यू आजाराने थैमान घातले असून, मंगरुळपीर शहरालगत असलेल्या पंचशिल नगर येथील विद्यार्थिनीला डेंग्यूची लागण झाल्याची बाब समोर आली. शहरालगत असलेल्या पंचशील नगर येथील एका १७ वर्षीय विद्यार्थिंनीला डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल आल्याने आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी या ठिकाणी भेट देऊन व माहिती घेऊन उपाय योजना केल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. पंचशील नगरामध्ये गेली अनेक महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या मूर्तिजापूर भागातील एका मुलीला डेंग्यूची लागण झाली असून, खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप नव्हाते यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, शहरालगत असलेल्या पंचशील नगर येथील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. याठिकाणी भेट देऊन व माहिती घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत, असे डॉ. नव्हाते म्हणाले.
मंगरुळपीरात आढळला डेंग्यूचा रुग्ण!
By admin | Updated: September 22, 2016 01:21 IST