अकोला : पावसाळय़ातील पाण्यामुळे प्रचंड साचलेली घाण आणि डबक्यांमधील पाण्यामध्ये डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होत आहे. त्यामुळे गत काही दिवसांपासून जिल्हय़ात पसरलेली डेंग्यूसदृश तापाची साथ अद्यापही कायम आहे. आरोग्य विभागाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हय़ात अल्प प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यानंतर कडाक्याचे उन्ह तापत असल्याने डेंग्यूसदृश तापाची साथ असून, या ह्यव्हायरलह्णने अनेकांना हैरान केले आहे. यावर आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. या व्हायरलमुळे नेमका कशाप्रकारे औषधोपचार करावा, याबाबत डॉक्टरही गोंधळात पडले असून, यावर आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. हा आजार डेंग्यूसदृश तापाचा व्हायरल असल्याचे प्रथम निदान करताना डॉक्टरांच्या निदर्शनास आले असून, आजार नागरिकांसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी सांगितले.
डेंग्यूसदृश तापाचा उद्रेक कायम
By admin | Updated: September 10, 2014 01:40 IST